आंबेडकर जयंती आधीच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिप्ट! या विद्यार्थ्यांना होणार फायदा…

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.

आंबेडकर जयंती आधीच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिप्ट! या विद्यार्थ्यांना होणार फायदा...
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 11:10 PM

मुंबई: राज्यातील विविध विद्यापीठातील शेकडो मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात 50 दिवसांपासून धरणे आंदोलन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. सामाजिक न्याय विभाग स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मात्र याच विभागाचे अधिकारीही 50 दिवसांत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे फिरकलेले नव्हते. मात्र त्यानंतर आज विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या फेलोशिपसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.

त्या आंदोलनाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरिता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते.

यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही मुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी अशी मुद्दाही मुख्यमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांना मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरिता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.