एक हजार पोलिसांच्या बंदोबस्तात नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त
सुरेश दास, मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेलं नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर अखेर पाडण्यात आलंय. एमआयडीसीच्या जागेवर हे भव्य मंदिर बांधण्यात आलं होतं. पोलिसांकडून हे मंदिर तोडण्यासाठी संरक्षण पुरवण्यात आलं. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सकाळी या ठिकाणाला भेट दिली आणि एक हजार पोलीस तैनात असताना हे पाडकाम […]
सुरेश दास, मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेलं नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर अखेर पाडण्यात आलंय. एमआयडीसीच्या जागेवर हे भव्य मंदिर बांधण्यात आलं होतं. पोलिसांकडून हे मंदिर तोडण्यासाठी संरक्षण पुरवण्यात आलं. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सकाळी या ठिकाणाला भेट दिली आणि एक हजार पोलीस तैनात असताना हे पाडकाम करण्यात आलं.
नवी मुंबईतील पावणे गावात हे मंदिर आहे. आतापर्यंत किमान तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने मंदिर पाडण्याचे आदेश दिले होते. बावखळेश्वर मंदिर ट्रस्टची याचिका वारंवार फेटाळण्यात आली. एमआयडीसीच्या जागेवर कोणत्याही परवानगीविना हे मंदिर बांधल्यामुळे ते बेकायदेशीर ठरवलं होतं.
तोडकामाच्या कारवाईचा कृती अहवाल 26 नोव्हेंबरच्या आत सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने यापूर्वीच एमआयडीसीला दिला होता.
हायकोर्टाच्या आदेशानुसार मंगळवारी पहाटे पाचपासूनच बावखळेश्वर मंदिरावर कारवाई करण्याचे नियोजन एमआयडीसी आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं. त्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच पावणे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
याआधी सर्वधर्मीय मंदिर बचाव समितीने मंदिर वाचवण्यासाठी वाशीच्या शिवाजी चौकात आंदोलन केलं होतं. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या फोटोवर चपला मारून निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र हा वाद गेले पाच ते सहा वर्षांपासून कायम होता.
शिव मंदीर, गणपती मंदिर, आंबे माँ हे तीन मंदिर आत आहेत आणि या तिन्ही मंदिरांचं तोडकाम करण्यात कारवाई दुपारी चार वाजल्यापासून सुरु करण्यात आली. या कारवाईमध्ये कुणाचाही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.