Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BDD Chawl : बीबीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधींच्या नावाने ओळखली जाणार

वरळीतील बीडीडी चाळ (BDD Chawl) आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ शरद पवार नगर, तर ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ राजीव गांधी नगर नावाने ओळखली जाणार आहे.

BDD Chawl : बीबीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधींच्या नावाने ओळखली जाणार
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 10:53 PM

मुंबई : बीडीडी चाळ रहिवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. वरळीतील बीडीडी चाळ (BDD Chawl) आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ शरद पवार नगर, तर ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ राजीव गांधी नगर नावाने ओळखली जाणार आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आलाय. याबाबतची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) केली होती. त्यानंतर आता शासन निर्णय जारी करण्यात आल्यानं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

शासन निर्णय काय?

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे सध्या प्रगतीत आहेत. सन 1921-1925 च्या दरम्यान तत्कालीन मुंबई विकास विभागाने या चाळी बांधलेल्या असल्याने, त्या बीबीडी चाळी म्हणून ओळखल्या जातात. या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने या चाळींचे नामकरण करण्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी 2022 च्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत जाहीर केलं आहे. त्यानुसार उपरोक्त बीडीडी चाळींचे पुढील प्रमाणे नामकरण करण्यात येत आहे.

1. बीडीडी चाळ, वरळी – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर 2. बीडीडी चाळ, ना. म. जोशी मार्ग – स्वर्गीय राजीव गांधी नगर 3. बीडीडी चाळ, नायगाव – शरद पवार नगर

हे सुद्धा वाचा
BBB chawl

बीडीडी चाळ नामकरणाचा शासननिर्णय

मुंबईकरांना बीडीडी चाळीतही मिळणार घर

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी म्हाडाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता म्हाडाने प्रकल्पाच्या तीनही ठिकाणी पुनर्वसन इमारतीसह विक्रीसाठीही घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे आता मुंबईकरांना बीडीडी चाळीमध्येही घरे उपलब्ध होणार आहेत, त्याबदल्यात म्हाडाला निधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाने यापूर्वी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन करून उपलब्ध जागेवर विक्रीसाठी घरे उभारण्याचा विचार केला होता. मात्र प्रकल्प वेळेत आणि विनाअडथळा पूर्ण होण्यासाठी म्हाडाने पुनर्वसन इमारतीबरोबरच विक्रिच्या इमरातचींचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.