मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या स्थानकांना बेस्ट आणि ई-बाईक कनेक्टीवीटी
बेस्टने बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी ई-बाईकची एक पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध केली आहे. नव्या मेट्रोच्या तीस स्थानकांना या ई-बाईकने टप्प्या-टप्प्याने जोडण्याची योजना आहे.
मुंबई : मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या गोरेगाव ते गुंदवलीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्गाटन परवाच झाल्यानंतर या स्थानकांवर बेस्टने आपल्या फिडर रूट सुरू केला आहे. यात आता बेस्ट ई-बाइक देखील सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार असून रिक्षा आणि टॅक्सीच्या महागड्या प्रवासातून मुंबईकराची सुटका होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची अलीकडेच भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे लास्टमाईल कनेक्टीविटी मिळणार आहे.
पंतप्रधान यांच्या हस्ते परवा मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या गोरेगाव ते गुंदवलीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्गाटन करण्यात आले आहे. यामुळे काल पहील्या दिवसांपासून या नविन स्थानकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल सायंकाळपासून मेट्रो सर्वसामान्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आले आहे. काल मेट्रो 7 वर सायंकाळच्या आठ वाजेपर्यंत 28,381 प्रवाशांनी प्रवास केला तर मेट्रो 2 अ मार्गावर 35,684 सायंकाळी आठ वाजेपर्यंत एकूण 64,065 प्रवाशांनी प्रवास केल्याचे एमएमआरडीए म्हटले आहे.
मेट्रोच्या या दोन मार्गिंकावर मिळून 30 स्थानकांची भर पडली आहे. या स्थानकात रिक्षा चालकांनी आपणा रिक्षा पार्कींग तसेच पुरेशी व्यवस्था केली नाही. या स्थानकांवर बेस्टने 20 जानेवारीपासून ए- 295, ए- 883, ए- 216 या तीन बस मार्गिकाना जोडले आहे. त्यात या बस स्थानकांवर 280 ई – बाईक उभ्या करण्यात येणार आहे.
काय आहे ई – बाईक योजना
बेस्टने बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी एक पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध केली आहे. बेस्ट उपक्रमाने जून 2022 पासून मुंबईतील निवडक थांब्यांवर विजेवर धावणारी दुचाकी सेवा सुरू केली. सध्या 700 दुचाकी सेवेत असून लवकरच आणखी एक हजार दुचाकीची त्यात भर पडणार आहे. दोन महिन्यात टप्प्याटप्याने या दुचाकीची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रथम अंधेरीत या सेवेची चाचणी करण्यात आली होती. आता मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ च्या सर्व स्थानकावर लास्ट माईल कनेक्टीवीटी अंतर्गत बेस्ट टप्प्या टप्प्याने ई-बाइक सेवा पुरविणार आहे. या नव्या मेट्रो नेटवर्कमुळे एकूण 30 नव्या स्थानकांची भर पडली असली तरी सर्वच स्थानकांवर ई- बाईक थांबविण्यासाठी जागा नसल्याचेही उघड झाले आहे.