BEST STRIKE: बेस्टचा संप दोन दिवस लांबण्याची चिन्हं

मुंबई:  पाच दिवसांपासून सुरु असलेला बेस्टचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे.  आज मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबतच्या बैठकीत बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली, मात्र जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी घेतली आहे. महापालिका – बेस्ट प्रशासन आणि […]

BEST STRIKE: बेस्टचा संप दोन दिवस लांबण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई:  पाच दिवसांपासून सुरु असलेला बेस्टचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे.  आज मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबतच्या बैठकीत बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली, मात्र जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी घेतली आहे.

महापालिका – बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजू उच्च स्तरीय समितीने ऐकून घेतल्या. उच्च स्तरीय समितीने कर्मचारी संघटनांकडून लेखी स्वरूपात मागण्या मागवून घेतल्या आहेत.  मुख्य सचिव चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर करणार आहे. कोर्टात मांडलेल्या अहवालावर कोर्ट काय निर्देश  देईल यावर बेस्ट संपाचं भवितव्य अवलंबून असणार. त्यामुळं संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरु आहे. विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीपासून संप पुकारला आहे. मात्र महापौर, मुंबई महापालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चेच्या फेऱ्या करुनही संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे बेस्ट संपावर मुंबई हायकोर्टाकडूनही मुंबईकरांना दिलासा मिळाला नाही. तोडग्यासाठी दोन दिवसांची मुदत देत मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली. आता सोमवारी याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे सरकार महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप मिटल्याची घोषणा करा असा आग्रह करत आहे. तर तोडगा निघेपर्यत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेनं घेतली आहे. आज पुन्हा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे.

दरम्यान, बेस्टच्या संपानं त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खासगी बस आणि स्कूल बस आजपासून प्रवासी वाहतूक करणार आहेत. या दोन्ही बस संघटनांच्या महासंघानं हा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन हजार खासगी आणि स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेत असणार आहेत. 10 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट, तर त्यापेक्षा जास्त प्रवासासाठी बेस्टच्या दरानुसार तिकिट आकारणार आहे. अपंग आणि जेष्ठ नागरिकांना मात्र मोफत प्रवास असणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास बेस्टची भाडेवाढ होणार, तिकीट दरांत 4 ते 23 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनासंदर्भात केलेल्या मागण्या मान्य झाल्या, तर वर्षांला 540 कोटी रुपयांचा बोजा बेस्टवर पडणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. ही वाढ चार ते 23 रुपयांपर्यंतची आहे.

बेस्ट कृती समितीची बैठक परळच्या शिरोडकर सभागृहात संपाच्या पार्श्वभूमिवर बेस्ट कामगार कृती समितीची सभा पार पडली. या सभेलाला बेस्ट संपाचे नेतृत्व करत असलेले शशांक राव उपस्थित होते. बेस्ट कामगारांचा संप सुरु ठेवूनच चर्चेला येणार असल्याचा ठाम निर्धार कृती समितीचे शशांक राव यांनी यावेळी केला.

मनसेचा पाठिंबा दरम्यान मनसेनंही बेस्ट कर्मचा-यांच्या संपाला पाठींबा दिला आहे. शिवसेनेनं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप मनसेनं केला. तसंच सरकारनं बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळीही मनसेनं केली. तर माहिममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेने आंदोलन केले. यावेळी बेस्टच्या जागेवर सुरु असलेले कनेकिया बिल्डरचे काम मनसेने थांबवले. बेस्टचे 320 कोटी रुपये कनाकिया बिल्डरकडे थकित ठेवल्याचा आरोप करत हे काम थांबवत मनसेने आंदोलन केले.. बसपाचा पाठिंबा बेस्टच्या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता बहुजन समाज पक्षानं ही बेस्टच्या संपक-यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बेस्टच्या मोठ्या जागा बिल्डरला विकून बेस्टला मुद्दाम शिवसेना आणि भाजप तोट्यात दाखवत असल्याचा आरोप बसपानं केला आहे.

भुजबळांचा आरोप

बेस्टच्या संपाला शिवसेना-भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. ते खेडमध्ये पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

बेस्ट संपाचा इतिहास, आतापर्यंतचा सर्वात मोठा संप

1997 मध्ये 4 दिवसाचा संप झाला होता, कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्त्वात  हा संप झाला होता.

2007 मध्ये-  महाव्यवस्थापक खोब्रागडे असताना एक संप झाला होता , 3 दिवसाचा संप होता, पण यावेळी महाव्यवस्थापकांनी काही कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून नवीन कामगार भरती केली होती, यावेळी कामगार नेते शरद राव अध्यक्ष होते

2011 मध्ये – यावर्षी सुद्धा 3 दिवसाचा संप झाला होता.

2017- मध्ये कामगार नेते शरद राव यांच्यानंतर शशांकराव यांनी धुरा घेतली. यावेळी 1 दिवसाचा संप झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं.

2019- यंदा पाचवा दिवस संप सुरु आहे

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
  • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
  • एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
  • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

संबंधित बातम्या 

BEST STRIKE : हायकोर्टातही बेस्ट संपावर तोडगा नाहीच  

कानपट्टीवर बंदुका ठेवून चर्चा होणार नाही, संप सुरुच राहणार : शशांक राव  

BEST STRIKE: महाराष्ट्र सरकारपेक्षा मुंबई महापालिका श्रीमंत : मुख्यमंत्री  

सलग सात तासांची बैठक निष्फळ, ‘बेस्ट’चा संपच सुरुच राहणार

संप मिटल्यावर बुके द्या, एकत्र राहा, राज यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला

संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस, मेस्माचीही कारवाई

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, आजही मुंबईकरांचे हाल

‘बेस्ट’ संपामुळे बेहाल मुंबईकरांसाठी एसटीच्या 55 बस रस्त्यावर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.