बेस्ट संप : आजही तोडगा नाही, उद्या दुपारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी

मुंबई : गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही तोडगा निघाला नाही. आज संपाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मात्र, तिथेही काही तोडगा निघाला नाही. मुंबई हायकोर्टात बेस्ट संपाबाबत उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे हायकोर्टाची नेमकी संपावर भूमिका काय, यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार […]

बेस्ट संप : आजही तोडगा नाही, उद्या दुपारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही तोडगा निघाला नाही. आज संपाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मात्र, तिथेही काही तोडगा निघाला नाही. मुंबई हायकोर्टात बेस्ट संपाबाबत उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे हायकोर्टाची नेमकी संपावर भूमिका काय, यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार आहे. बेस्टच्या संपावर आज तरी तोडगा निघेल, अशी आशा होती. मात्र, आजही काहीच झालं नाही, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल असेच सुरु राहणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली होती, त्यावरही सुनावणी होणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. हा संप बेकायदेशीर असून कोर्टाने कर्मचाऱ्यांना त्वरित रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अ‍ॅड. दत्ता माने यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका बाजू मांडली.

मनसेचा पाठिंबा

मनसेनंही (MNS) बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा दिला आहे. शिवसेनेनं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप मनसेनं केला. तसंच सरकारनं बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळीही मनसेनं केली. तर माहिममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेने आंदोलन केले. यावेळी बेस्टच्या जागेवर सुरु असलेले कनेकिया बिल्डरचे काम मनसेने थांबवले. बेस्टचे 320 कोटी रुपये कनाकिया बिल्डरकडे थकित ठेवल्याचा आरोप करत हे काम थांबवत मनसेने आंदोलन केले.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

  • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
  • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी. एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
  • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.