मुंबईकरांसाठी बेस्टची लवकरच 55 ठिकाणी ई-चार्जिंगची सुविधा

मुंबईकरांना आता आपल्या ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन शोधत फिरण्याची गरज नाही, बेस्ट एकूण 55 ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशनची निर्मिती करीत आहे. या ई-चार्जिंग स्टेशनकरीता मोबाईलने ऑनलाईन स्लॉट बुक करता येणार आहे.

मुंबईकरांसाठी बेस्टची लवकरच 55 ठिकाणी ई-चार्जिंगची सुविधा
BEST-E-CHARGINGImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 3:02 PM

मुंबई : इलेक्ट्रीक वाहने घेण्याचे वाढते चलन पाहून भविष्यातील आव्हाने पाहता आता बेस्टनेही ( BEST ) आपल्या ताफ्यात प्रदुषणमुक्त इलेक्ट्रीक (  ELECTRIC )  बसेसची संख्या वाढविली आहे. या बसेससाठी बेस्टच्या आगारात ई -चार्जिंगची सुविधा उभारण्यात येत आहे. आता या ई – चार्जिंग स्थानकात (e-charging stations ) खाजगी वाहनांनाही आपले वाहन चार्जिंग करता येणार आहे. मुबईकरांची सेकंड लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टने एकूण 55 ठिकाणी तब्बल 330 ई – चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली आहे.

बेस्ट मुंबईकरांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी आपल्या ताफ्यात मार्च 2024 पर्यंत तब्बल चार हजार ई-बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्टने या बसेस चार्ज करण्यासाठी एकूण 55 ठिकाणी तब्बल 330 ई – चार्जिंग स्टेशनची उभारणी करणार आहे. त्यातील दहा चार्जिंग स्टेशन मार्च 2023 पर्यंत तयार होणार आहेत.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की या महिन्याअखेर काही ठिकाणची ई- चार्जिंग स्टेशन तयार होतील, काही ठिकाणी आम्हाला कनेक्टीव्हीटीचा इश्यू होत आहे. तर काही ठिकाणी मीटर आणि वीज कनेक्शनची अडचण होत आहे. त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमच्या वाहनांसाठी ई – चार्जिंगकरण्यासाठी आम्ही सुविधा निर्माण करीत आहोत. शाळांच्या बसेससह खाजगी वाहन चालकही त्यांच्या कार आणि टु व्हीलर येथे चार्ज करू शकतील असेही महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. त्यासाठी त्यांना अर्थातच पैसे मोजावे लागतील असेही त्यांनी सांगितले.

बेस्टच्या खाजगी बसेससाठी रेव्हेन्यू शेअरींग बेसिसवर चार्जिंगची सुविधा असेल. चार्जिंगचा रेट प्रत्येक युनिट मागे निश्चित केला जाणार असून तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल, तसेच बेस्टमधील खाजगी बसेससाठी  रेव्हेन्यू शेअरींग बेसिसवर  तो आकारला जाईल असे त्यांनी सांगितले.

बेस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एकूण 55 ठिकाणांची ( बस डेपो आणि स्थानक ) ई – चार्जिंग स्टेशनची निवड वाहनांच्या पार्कींगसाठी पुरेशी जागा आणि सोयीसुविधा पाहून केली जात आहे. त्यामुळे अनेक वाहनांना एकाच वेळी चार्जिंक करता येईल.

प्रवाशांना त्यांची चार्जिंगची जागा स्लॉट पाहून बुक करता येईल असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी वाहनचालकांना ऑनलाईन सेवेद्वारे आपला स्लॉट बुक करून जागा निश्चित झाल्यावर ऑनलाईन पैसे भरता येतील असे चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

खालील ठिकाणी ई- चार्जिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू

कुलाबा, बॅकबे, एनसीसीआय, मंत्रालय, म्युझियम, हिरानंदानी बस स्टेशन, ताडदेव बस स्टेशन, वांद्रे रेक्लमेंशन, वांद्रे पूर्व बस स्थानक, माहिम बस स्थानक, वांद्रे पश्चिम बस स्थानक, गोरेगाव बस डेपो, गोरेगाव पश्चिम बस स्थानक, सेव्हन बंगलो बस स्थानक, वाळकेश्वर बस स्थानक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.