मुंबई : बेस्टने ओला आणि उबरच्या धर्तीची वातानुकुलित आणि मोबाईलवरुन ‘चलो अॅप’ने तिकीट आरक्षित करता येणारी आरामदायी वातानुकूलित प्रीमियम बस सेवा गेल्यावर्षी 12 डिसेंबर पासून आधी बीकेसी ते ठाणे आणि नंतर मुंबई विमानतळ ते खारघर आणि कफपरेड सुरु केली होती. बेस्टच्या ताफ्यात आधी 60 प्रीमियम बसेस होत्या आता नव्या 40 बसेस ताफ्यात दाखल झाल्याने या बससेवेचा विस्तार करण्यात आला आहे.
नवीन मार्गावर धावणार
खारघर-बीकेसी मार्ग क्र. एस-114 स.7 आणि स.8.30 वाजता तसेच सायं. 5 आणि रा. 7.30 वा. सुटणार आहे. या बसेसचे तिकीट 134 रुपयांपासून सुरू होईल. ही बस खारघर, नेरूळ, सानपाडा, वाशी, बीकेसी अशी धावणार आहे.
बेलापूर – बीकेसी ही एस-115 ही बस स. 7 आणि स.8.30 वा. तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. या बसचे तिकीट 134 रुपयांपासून सुरू होईल.
खारघर-अंधेरी ही एस-116 ही बस स. 7 आणि स.8.30 वा. तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. हीचे तिकीट 149 रुपयांपासून सुरू होईल.
बेलापूर-अंधेरी एस-117 ही बस स.7 आणि स.8.30 वाजता तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. या बसचे तिकीट 149 रुपयांपासून सुरू होईल, ती बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, अंधेरी अशी धावेल.
लोढा अमारा ( ठाणे ) – अंधेरी ही मार्ग क्र एस-118 बस स.7 आणि स.8.30 वाजता तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. या बसचे तिकीट 134 रुपयांपासून सुरू होईलही बस लोढा अमारा, पाटील पाडा, मुलुंड चेकनाका, सीप्झ, अंधेरी मार्गावरून धावेल.
कुर्ला-बीकेसी ही मार्ग क्र. 119 ही बस स.9 वा. आणि रात्री 7 वा. सुटेल. हीचे तिकीट 30 रुपयांपासून सुरू होईल. ही बस कुर्ला स्थानक आणि बीकेसी अशी धावेल.
गुंदवली-बीकेसी ( व्हाया कालिना ) मार्ग क्र. एस-120 ही बस स.9 वा. आणि रात्री 7 वा. सुटेल. हीचे तिकीट 64 रुपयांपासून सुरु होईल ही बस गुंदवली मेट्रो, कालिना, बीकेसी अशी धावेल.
अंधेरी-सिप्झ मार्ग क्र. एस-121 ही बस स.9 वा. आणि रात्री 7 वा. सुटेल. हीचे तिकीट 30 रुपयांपासून सुरु होईल, ही बस अंधेरी स्थानक, गुंदवली आणि सीप्झ अशी धावेल. या बसेस पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांना सवलत असेल.
हे पाहा वेळापत्रक