फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय, सरकार पाडण्याच्या दाव्यावर भाई जगतापांचा हल्लाबोल

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा दावा केला. यावर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी हल्लाबोल केलाय.

फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय, सरकार पाडण्याच्या दाव्यावर भाई जगतापांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 8:35 PM

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा दावा केला. यावर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं म्हणत भाई जगताप यांनी हल्ला चढवला. तसेच याआधीच्या 7 दिवसात, 1 महिन्यात आणि 1 वर्षात सरकार पाडण्याच्या दाव्यांचं काय झालं हे सर्वांना पाहिलं असल्याचं म्हणत टोला लगावला. ते आज (6 फेब्रुवारी) मुंबईच्या सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात पदयात्रा काढण्यात आली, तेव्हा बोलत होते (Bhai Jagtap criticize Devendra Fadnavis over claim of Government Formation in Maharashtra).

‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हे ब्रीद वाक्य घेऊन 100 दिवसात 100 वार्ड असा संकल्प करून भाई जगताप यांनी या पदयात्रेला सुरवात केलीय. याच पदयात्रेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाई जगताप म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. फडणवीस सुरुवातीपासून सरकार पाडण्याबाबत वक्तव्यं करत आहेत. हे सरकार स्थापन झाल्यावर फडणवीसांनी आधी 7 दिवसात सरकार पडणार असल्याचं म्हटलं. नंतर त्यांनी 1 महिना आणि 1 वर्षात सरकार पडणार असं भाकीत केलं. या भाकितांचं काय झाले हे सर्वांनी पाहिलंय.”

“महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृवावर विश्वास दाखवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. ते सरकार पडणार नाही,” असंही वक्तव्य भाई जगताप यांनी केलं.

या पदयात्रेचं उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर येथील शिवाजी चौकात करण्यात आलं. या रॅलीत चरणसिंग सप्रा, मुंबई पालक मंत्री, अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सायन कोळीवाडा येथील प्रतीक्षा नगर शिवाजी चौक येथून पडयात्रेला सुरवात झाली. पुढे ही पदयात्रा सायन ते अँटॉप हिल विभाग, शिवाजी चौक, प्रतीक्षा नगर, शुक्ला हॉटेल, देवेंद्र चौक, क्राईम ब्रांच, सोहन सिंग कोहली चौक, कोकरी आगार, अँटॉप हिल दरगाह, भरणी नाका, संगम नगर, अमर नगर, आझाद मोहल्ला, शांती नगर, वडाळा टिटी डेपोपर्यंत गेली.

हेही वाचा :

फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले सत्तांतराचे संकेत

यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच’ करत बसावं लागणार, खडसेंचा फडणवीसांना टोला

आधी फडणवीस म्हणाले फासा आम्हीच पलटणार, आता संजय राऊत म्हणतात…

व्हिडीओ पाहा :

Bhai Jagtap criticize Devendra Fadnavis over claim of Government Formation in Maharashtra

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.