Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या सिलेंडरमध्ये किती किलो गॅस? गॅस चोरणारी टोळी सापडली

भारत गॅसच्या एका एजन्सीवर छापा टाकत गॅस चोरीचा एक प्रकार नुकतंच (Bharat Gas stealing in kalyan) उघडकीस केला आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून 3 जणांना अटक केली आहे.

तुमच्या सिलेंडरमध्ये किती किलो गॅस? गॅस चोरणारी टोळी सापडली
Follow us
| Updated on: Oct 07, 2019 | 6:04 PM

कल्याण : भारत गॅसच्या एका एजन्सीवर छापा टाकत गॅस चोरीचा एक प्रकार नुकतंच (Bharat Gas stealing in kalyan) उघडकीस केला आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी हा प्रकार (Bharat Gas stealing in kalyan) उघड केला आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून 3 जणांना अटक केली (Bharat Gas stealing in kalyan) आहे.

कल्याण पश्चिमेतील भानुनगर परिसरात भारत गॅसची एक एजन्सी आहे. यात घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरून चोरी केली जाते अशी माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक संभाजी जाधव आणि एपीआय संजय डामरे यांच्या पथकाने गॅस एजन्सीवर छापा टाकला. घरगुती गॅस सिलेंडरचे वजन करण्यात आले. त्यावेळी त्यातील प्रत्येक सिलेंडरमध्ये 1 ते 2 किलो गॅस कमी आढळून आला. गॅस चोरीचा हा सर्व प्रकार एजन्सीमध्ये सुरु होता.

या प्रकरणी रमाकांत पस्टे, रमेश गुरव, दिनेश शेरखाने या एजन्सीचे दोन मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. तर रोहित सूचक आणि उमेश बनसोडे या इतर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

गॅस चोरीच्या या प्रकारामुळे कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होते याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तसेच गॅसचे संपूर्ण पैसे ग्राहकांकडून घेतले जातात. मात्र त्या बदल्यात कमी गॅस दिला जातो, हे देखील यानिमित्ताने समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस टाकताना मोठी दुर्घटना देखील घडू शकते याचा विचारही या चोरट्यांनी केलेला नव्हता. दरम्यान वेळीस ही चोरी पकडली गेल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोललं जात आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.