Bhaskar Jadhav : मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले; प्रश्नोत्तराच्या तासात जाधव-राणेंचा सामना

भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

Bhaskar Jadhav : मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले; प्रश्नोत्तराच्या तासात जाधव-राणेंचा सामना
विधानसभेत भास्कर जाधव-नितेश राणे यांच्यात झाला शाब्दिक वादImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 12:22 PM

मुंबई : मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणे (Nitesh Rane) यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. रवींद्र चव्हाण आणि सुनील प्रभू यांच्या प्रश्नोत्तराच्या वेळी हा प्रकार घडला. मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तरे देत आहेत, असा टोला भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राज्य सरकारला लगावला. 2023 हा आकडा कायम आहे, परशूराम घाटाचा विषय कायम आहे, लोकांच्या कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे. कोर्ट कचेरी पनवेल ते इंदापूर थोडीशी आहे, बाकी कुठे नाही, असे आपले मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो, असे भास्कर जाधव म्हणाले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद (Verbal argument) झाल्याचेही पाहायला मिळाले.

‘मी मंत्र्यांशीच बोलतोय’

भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी बसूनच काहीतरी बोलण्याचा प्रकार केला. यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मी मंत्र्यांशीच बोलत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना काहीतरी शिकवा, अशी भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना विनंती केली. याआधीही या दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेला पाहायला मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

विधानसभेत काय घडले? पाहा

फडणवीस-जाधव यांच्यातही टोलेबाजी

माझ्या लक्ष्यवेधीला उत्तर कधी मिळणार, त्यावर मला प्रश्न विचारायचे होते, असे भास्कर जाधव देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. त्यावर भास्कर जाधव यांना वाचनाची गरजच काय, त्यांना सगळे समजते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आमच्या लक्ष्यवेधीला उत्तर आलेले नाही, आम्ही वाचायचे कधी आणि प्रश्न विचारायचे कधी, असे जाधव म्हणाले होते. पुकारण्याआधी उत्तर देण्याची व्यवस्था आपण करू, असे अध्यक्षांनी म्हणताच, देवेंद्र फडणवीस उठून म्हणाले, की भास्कररावांना वाचायची गरज काय, त्यांना पाहिल्याबरोबर समजते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.