Bhavana Gawali : ईडीच्या चौकशीला भावना गवळी तिसऱ्यांदा गैरहजर, पुन्हा 15 दिवसांची वेळ मागितली

गेल्या अनेक दिवसांपासून भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्यामागेही ईडीच्या चौकशीचा फेरा लागला आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यासाठी ईडीने आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बाजवले होते. मात्र यावेळीही भावना गवळी या चौकशीला गैरहजर राहिल्या आहेत.

Bhavana Gawali : ईडीच्या चौकशीला भावना गवळी तिसऱ्यांदा गैरहजर, पुन्हा 15 दिवसांची वेळ मागितली
Bhavana GawaliImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:01 PM

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीच्या चौकशीचा (ED) फेरा लागला आहे. त्यात नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या जेलमध्ये आहे. एका जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आलीय. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावर कोट्यवधींच्या मनी लॉन्ड्रिंगाचा आणि सचिन वाझेला कोट्यवधींची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) हे फक्त दोनच नेते ईडीचीच्या रडारवर नाहीत, यात नेत्यांनी यांदी खूप मोठी आहे. त्यात शिवसेना खासदार भावना गवळी यांचाही समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्यामागेही ईडीच्या चौकशीचा फेरा लागला आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यासाठी ईडीने आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बाजवले होते. मात्र यावेळीही भावना गवळी या चौकशीला गैरहजर राहिल्या आहेत.

पुन्हा ईडीकडे वेळ मागितली

आज भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंह हे ईडी कार्यालयात दिसून आले. या प्रकरणाशी संबधित दस्तावेज कागदपत्रं ईडी अधिकाऱ्याकडे दिल्याची माहिती वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली. तसेच तर शिवसेना खासदार भावना गवळी आज ईडी चौकशीला हजरच राहिल्या नाहीत. भावना गवळी यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयात जाऊन ईडी अधिकाऱ्यांकडे 15 दिवसांची वेळ मागितली, असल्याचीही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत भावना गवळी एकदाही ईडी चौकशीला हजर झाल्या नाहीत, ईडीचे हे तिसरे समन्स त्यांना बजावण्यात आले होते. महिला उत्कर्ष मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपास सुरू आहे. त्याच्याच चौकशीचा फेरा भावना गवळी यांच्या मागे लागला आहे.

किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमीच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. त्यांनी शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्यावरही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी चौकशीला समोरे जायला हवं असेही समोय्या यांनी म्हटलं आहे. तसेच 100 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी ईडीच्या चौथ्या समन्सलाही उपस्थित राहण्यास नकार दिला. भीती कशाची वाटते त्यांना ? असा सवाल सोमय्या यांनी गेला आहे. तसेच हिशोब तर द्यावाच लागणार!! भावना गवळींनी आधीच येऊन पैसे जमा करावे नाहीतर कुणीतरी कोर्टात जाणार आणि कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते जलमध्ये जाणार असल्याचे भाकीत भाजप नेते किरीट सोमय्या हे वारंवार वर्तवत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ईडी काय निर्णय घेणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.