कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांचा मोठा निर्णय, वसईतील कळंब बीचवर लॉकडाऊन

| Updated on: Nov 22, 2020 | 4:54 PM

वसईतील कळंब ग्राम पंचायतीने 18 नोव्हेंबर ते पुढील आदेश येईपर्यंत गाव आणि कळंब बीचवर पुन्हा लोकडाऊन सुरू केलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांचा मोठा निर्णय, वसईतील कळंब बीचवर लॉकडाऊन
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) येण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. येणारे 2 महिने हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक असल्याने प्रत्येकानं सतर्क व्हावं असं अहवान केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर वसईतील (vasai) कळंब ग्राम पंचायतीने 18 नोव्हेंबर ते पुढील आदेश येईपर्यंत गाव आणि कळंब बीचवर पुन्हा लोकडाऊन (Lockdown) सुरू केलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान नागरिकांसाठी कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. (Big decision of villagers to stop the second wave of corona lockdown on Kalamb beach in Vasai)

ज्या दिवसापासून ग्राम पंचायतीने लॉकडाऊन सुरू केलं. त्याच दिवशी गावातील एका महिलेचं कोरोनानं निधन झालं. गावात आतापर्यंत 200 पेक्षा जस्त नागरिक क्वारंटाईन असून काहीजण कोरोनाबाधित असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचा धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा लॉकडाऊन सुरू केला आहे.

इतकंच नाही तर ग्रामपंचायतीने गावात लॉकडाऊन केले असल्याचे बॅनरही गावाच्या गेटवर दर्शनीय ठिकाणी लावले आहेत. दोन दिवसांपूर्वी छटपूजा झाली. छटपूजेनिमित्त हजारो नागरिक पूजा करण्यासाठी बीचवर येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आधीच सावधगिरीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं असल्याचंही सांगण्यात येत आहे.

खरंतर, कळंब गावात अनेक रिसॉर्ट आहेत. शनिवार-रविवार म्हटलं की बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळाली. त्या पर्यटकांसाठी ही गावकऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत. आज रविवार असल्यानं अनेक पर्यटक बीचवर आल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा हा लॉकडाऊन किती यशस्वी होईल हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्यभर लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिल्लीत दर दिवशी हजारो लोकांना कोरोनाची बाधा होत आहेत. तर दिल्ली पाठोपाठ मुंबईची परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

इतर बातम्या – 

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, पुण्यातील गर्दीवर अजित पवारांचा खोचक टोला

(Big decision of villagers to stop the second wave of corona lockdown on Kalamb beach in Vasai)