Transfer Of IPS Officers: सत्ता बदलाच्या संघर्षात महाराष्ट्रातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारने चार दिवसांत 182 आदेश काढले
सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मुंबई, ठाणे आणि पुण्यातील आयुक्तांची बदली बाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्यांवर बंदी घातली होती. या निर्णयाच्या एक दिवस आधी मंत्रालयाने पोलीस दलात मोठे फेरबदल केले होते.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटला असतानाच गृहखात्याने महाराष्ट्रातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा(transfer IPS officers ) मोठा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. ठाकरे सरकारने चार दिवसांत 182 आदेश काढल्याचेही समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा
महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या संघर्षात आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही चर्चा रंगली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मुंबई, ठाणे आणि पुण्यातील आयुक्तांची बदली होणार
सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मुंबई, ठाणे आणि पुण्यातील आयुक्तांची बदली बाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्यांवर बंदी घातली होती. या निर्णयाच्या एक दिवस आधी मंत्रालयाने पोलीस दलात मोठे फेरबदल केले होते.
ठाकरे सरकारने चार दिवसांत 182 आदेश काढले
राज्यात सत्ता संघर्ष पेटला असताना ठाकरे सरकारनेही अनेक निर्णय छुप्या पद्धतीने घेतले असल्याचा आरोप केला जात आहे. मागील चार दिवसांत सरकारने 182 आदेश जारी केले असून, त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील खडाजंगीनंतर महाराष्ट्र सरकारने अनेक निर्णय घेतले. हे निर्णय घेतले जात असताना शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये फूट पडल्याचीही चर्चा रंगली आहे.
सरकारला वाचवण्यासाठी सातत्याने बैठकांचा फेरा सुरू आहे
सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 50 पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासह गेल्याचा दावा केला आहे. यामुळे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या बैठकांचा सिलसीला सुरु आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पाच महत्वाचे ठराव पास करुन एकनाथ शिंदे गटाला थेट चॅलेंज दिले आहे. आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. तर, भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांची सभा होणार आहे.