महाराष्ट्रातील तरुणांसाठी Indian Army मध्ये निघाली मोठी भरती, या कॅटेगरीसाठी विशेष घोषणा, असा करा अर्ज

भरती वर्ष 2024-25 साठी अग्निवीरांची भर्ती दोन टप्प्यात केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (ऑनलाइन सीईई तर दुसर टप्पा हा भर्ती मेळावा आहे.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी Indian Army मध्ये निघाली मोठी भरती, या कॅटेगरीसाठी विशेष घोषणा, असा करा अर्ज
INDIAN ARMYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 6:32 PM

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : भारतीय सैन्यात दाखल होण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, काही कारणास्तव ज्या तरुणांना सैन्यात भारी होता येत नाही अशा तरुणांसाठी सैन्य भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सैनिक भर्ती कार्यालय, मुंबईने 2024 – 25 साठी अधिसूचना जारी केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत ही भरती केली जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात कायमचे वास्तव्य असणाऱ्या उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्याच्या तारखा 22 एप्रिल 2024 नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. 13 फेब्रुवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

सैनिक भर्ती कार्यालयाने (मुंबई) यांनी वर्ष 2024-25 करिता अग्निवीर प्रवेश निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भरती वर्ष 2024-25 साठी अग्निवीरांची भर्ती दोन टप्प्यात केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (ऑनलाइन सीईई तर दुसर टप्पा हा भर्ती मेळावा आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी प्रक्रिया

1. सर्व उमेदवारांनी joinindianarmy.nic.in वर लॉग इन करावे, त्यांची पात्रता स्थिती तपासावी आणि स्वतःचे प्रोफाइल तयार करावे.

2. ऑनलाइन नोंदणीची मुदत (अर्ज सादर करणे) 13 फेब्रुवारी ते 22 मार्च 2024 अशी आहे.

3. अर्जदाराच्या डिजिलॉकर खात्यातून वैयक्तिक तपशील प्राप्त केला जाईल.

4. ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवाराला प्रति अर्जदार रु. 250/- परीक्षा शुल्क भरावे लागेल. यासाठी प्रमुख बँकांच्या मेस्ट्रो, मास्टर कार्ड, व्हिसा, रूपे कार्ड्स दोन्ही क्रेडिट आणि डेबिटद्वारे पेमेंट गेटवे सुविधा, एसबीआय आणि इतर बँकांचे इंटरनेट बँकिंग, यूपीआय (भीम) असे पर्याय देण्यात आले आहेत.

5. बनावट, अपूर्ण आणि चुकीचा भरलेला अर्ज नाकारला जाईल. उमेदवारांना संपर्क साधण्यासाठी सक्रिय ईमेल आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

6. उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी पाच पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिल्या तीन निवडींवर आधारित परीक्षा केंद्र देण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. एकदा परीक्षा केंद्र निवडले तर ते पुन्हा बदलत येणार नाहीत.

7. परीक्षेसाठी विहित तारखेला आणि वेळेवर हजर न राहणाऱ्या उमेदवारांना इतर दिवशी परीक्षेची मुभा दिली जाणार नाही.

8. ऑनलाइन नोंदणी आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांना मुंबईतील सैनिक भर्ती कार्यालयाच्या हेल्पलाइन क्रमांक 022-22153510 वर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सहाय्य केले जाईल.

9. उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार ऑनलाइन सीईई सराव करण्यास सक्षम करण्यासाठी JoinIndianArmy या संकेतस्थळावर श्रेणी निहाय लिंक प्रदान करण्यात आली आहे.

10. “नोंदणी कशी करावी” आणि “ऑनलाइन सीईई साठी कसे उपस्थित राहावे” याचे ॲनिमेटेड व्हिडिओ www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

11. उमेदवारांनी संकेतस्थळावर स्वतःचे अलीकडील छायाचित्रे अपलोड करायचे आहे. अपलोड केलेला फोटो चेहऱ्याशी जुळत नसल्यास उमेदवाराला ऑनलाइन सीईई परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही.

12. उमेदवारांनी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रिंट आऊटसह परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेच्या ठिकाणी, पडताळणी दरम्यान किंवा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही उमेदवाराची चुकीची माहिती आढळल्यास त्यांना ऑनलाइन परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

13. आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक/वैद्यकीय मानके आणि नोकरीचे तपशील याविषयीचे तपशील उमेदवाराच्या लॉगिन अंतर्गत www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.