मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईमधील ब्रीच कँडी या रूग्णालयामध्ये लहानशी शस्त्रकिया होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रतिभ ताईंच्या हातावरील शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांना रात्री 8.30 वाजता घरी सोडण्यात येणार आहे.
दोन दिवसांआधी प्रतिभा पवार घरात पडल्या होत्या त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. प्रतिभा पवार यांच्या हातावर छोटी शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. मुल्लाजी यांनी प्रतिभाताईंच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून रात्री 8.30 वाजता त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ब्रीच कँडी रूग्णालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही उपस्थित होते.
दुपारच्या सुमारास बातमी समोर आली होती की, प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडणार होती मात्र नेमकी कोणती कशामुळे शस्त्रक्रिया होत आहे यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती.आता याबाबत खुलासा झाला असून त्यांच्या हाताला दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रतिभा पवार यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सांगिलतलं आहे. आज म्हणजेच गुरूवारी 8.30 वाजता त्यांनी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे.