ना खुर्चीसाठी, ना सत्तेसाठी, माझा लढा जनतेसाठी, अभिजीत बिचुकलेंचं ठाकरे सरकारविरोधात आंदोलन

महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी माफ करा, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे. (Abhijit Bichukale Agitation in Azad Maidan) 

ना खुर्चीसाठी, ना सत्तेसाठी, माझा लढा जनतेसाठी, अभिजीत बिचुकलेंचं ठाकरे सरकारविरोधात आंदोलन
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 12:02 AM

सातारा : बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जनतेची आणि महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी माफ करा, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे. (Abhijit Bichukale Agitation in Azad Maidan)

अभिजीत बिचुकले यांनी मुंबईतील घरपट्टी माफ करा, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवदेन पाठवले होते. या निवेदनात ही मागणी मान्य न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करेन, असे म्हटले होते. बिचुकले यांनी पाठवलेल्या या निवदेनाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येत्या 23 जानेवारीपासून अभिजीत बिचुकले बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे.

अभिजीत बिचुकले नेमकं काय म्हणाले? 

“मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे कर माफ करा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी १० डिसेंबरला पत्र लिहिले होते. राज्यातील सर्व नगरपालिकांना याबाबतचे आदेश देऊन घरपट्टी माफीचे आदेश काढा. यासाठी मी एक महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं. जर मागण्या मान्य केलं नाही, तर मी मातोश्रीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करेन. पण मातोश्रीसमोरील या आंदोलनाला नकार मिळाला. मी 23 जानेवारीला आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे,” अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली.

“मी शिवरायाच्या विचारांचा वारसा जपतो. जर आज महाराज असते तर त्यांनी शेतचारा, जमिनीचे हप्ते माफ केले असते. मी सध्या घरपट्टीचा मुद्दा उचलतो आहे. ना खुर्चीसाठी, ना सत्तेसाठी, माझा लढा माझ्या राज्यातील जनतेसाठी,” असेही अभिजीत बिचुकले म्हणाले.

“शिवसेना पक्ष सांगलीत या मुद्द्यावरुन लढत आहे. जर शिवसेना सांगलीत लढत असेल, तर मुंबईसाठी दुटप्पी भूमिका का मुंबईकरांची घरपट्टी का माफ करत नाही?” असा प्रश्न अभिजीत बिचुकलेंनी उपस्थित केला आहे.  (Abhijit Bichukale Agitation in Azad Maidan)

संबंधित बातम्या : 

अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ

ना कोटी, ना लाख, अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.