Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bird Flu : बर्ड फ्लू कल्याणमध्ये! ठाणे, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगण्याची गरज, यवतमाळमध्येही 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

कल्याणमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.

Bird Flu : बर्ड फ्लू कल्याणमध्ये! ठाणे, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगण्याची गरज, यवतमाळमध्येही 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 8:33 PM

कल्याण : देशभरात कोरोनाचं गहिरं संकट असताना आता बर्ड फ्लूचा धोकाही वाढतोय. कारण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या आहेत. आता कल्याणनजिकच्या वडवलीमध्येही दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याचे नमुने पशुसंवर्धन विभागाकडून तपासण्यात आले. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. उद्यापासून परिसरातील सर्व कोंबड्या मारण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांनी तशी माहिती दिली आहे. (Bird flu kills chickens in Kalyan, 2,000 chickens die in Yavatmal)

यवतमाळमध्ये 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

यवतमाळ शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या रातचांदना इथं एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच प्रशासनानं राजचांदना गावात धाव घेत मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. 2 हजार कोंबड्या अचानक मेल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म मालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

रातचांदना इथल्या महंमद अमीन सोळंकी हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरु केला. त्यातून त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत होती. मात्र, अचानक 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं अमीन यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर अमीन यांनी पशुसंवर्धन विभागाला याची माहिती दिली. अचानक कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मोठा खड्डा करुन शास्त्रोक्त पद्धतीनं मृत कोंबड्या नष्ट करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

बर्ड फ्लूची लक्षणे :

कफ, अतिसार, ताप, श्वसन समस्या, डोकेदुखी, स्नायू वेदना, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि अस्वस्थता या सारख्या समस्या ‘बर्ड फ्लू’ची लक्षणे आहेत. जर, आपल्याला देखील यापैकी कोणती लक्षणे जाणवत असतील, तर दुसर्‍या एखाद्याच्या संपर्कात येण्यापूर्वी डॉक्टरांची भेट घ्या.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्लूचे बरेच प्रकार आहेत. परंतु, H5N1 हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना 1997मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता (Bird Flu symptoms, Causes, treatment and precaution).

H5N1 हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस 165ºF वर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. परंतु, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची किंवा उकडून खाऊ नयेत.

संबंधित बातम्या : 

Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird flu kills chickens in Kalyan, 2,000 chickens die in Yavatmal

ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.