मामा म्हणून जयंत पाटील कसे आहेत? भाच्चीनं लिहिलेलं पत्र महाराष्ट्रात व्हायरल, वाचा एका क्लिकवर

या शुभेच्छांमधून राजकारणातील मोठं नाव असलेले जयंत पाटील माणूस म्हणून आणि खास करुन मामा म्हणून कसे आहेत? याचा उलगडा होतो.

मामा म्हणून जयंत पाटील कसे आहेत? भाच्चीनं लिहिलेलं पत्र महाराष्ट्रात व्हायरल, वाचा एका क्लिकवर
Jayant patil
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 8:01 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळींनी जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. जयंत पाटील यांनीही सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आभार मानले आहेत. पण जयंत पाटील यांना एका व्यक्तीने अगदी खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांमधून राजकारणातील मोठं नाव असलेले जयंत पाटील माणूस म्हणून आणि खास करुन मामा म्हणून कसे आहेत? याचा उलगडा होतो.(Birthday wishes to NCP State President Jayant Patil from Sonali Tanpure)

सोनाली प्राजक्त तनपुरे यांनी जयंत पाटील यांना एक पत्र लिहून खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली तनपुरे यांनी आपल्या पत्रात नेमंक काय म्हटलंय, पाहूया

“आदरणीय जयंत मामा, सर्वप्रथम आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! राज्यातील जनतेकरिता तुम्ही एक संयमी राजकारणी, अभ्यासू मंत्री, अर्थतज्ञ आणि कुशल प्रशासक तर आहातच. मात्र, कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही आम्हा सर्वांच्या खूप जवळचे आहात. कुटुंबातील लहानांपासून-थोरांपर्यंत सर्वांना जोडून ठेवण्याचे कौशल्य तुमच्याकडे आहे. म्हणूनच माझी मुलेही तुमचा खूप आदर करतात. नातं जपण्याचं कौशल्य खरंतर तुमच्याकडून आत्मसात करायला हवे. राज्याचा इतका मोठा भार वाहत असतानाही, घरातील सर्वांच्या अडीअडचणीला तुम्ही धावून जाता”.

“प्रसंगी हळवा पण कणखर असा तुमचा स्वभाव आम्हा सर्वांना भावतो. मन मोकळं करण्यासाठी तुमच्याकडे एक हक्काची स्पेस आम्हा सर्वांना मिळते. खरंतर तुमच्याबद्दल सांगण्यासारख्या, मनाला भावणाऱ्या असंख्य घटना, गोष्टी आहेत. प्राजक्त आणि माझ्यासाठी तुम्ही वडिलांच्या स्थानी आहात. आमच्या या आधारस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!” अशा शब्दात सोनाली तनपुरे यांनी आपल्या मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सत्यजित तांबेंकडूनही खास शुभेच्छा

हसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जयंत पाटील यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाच एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, अशा सदिच्छाही तांबे यांनी व्यक्त केल्या आहे. ‘काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं याच सदिच्छा’, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबतचा एक फोटोही जोडला आहे.

संबंधित बातम्या : 

‘एक दिवस तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्वं करावं’, काँग्रेस नेत्याच्या जयंत पाटलांना खास शुभेच्छा

भाजपची 2024 ला पुन्हा सत्ता आली तर…., जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

Birthday wishes to NCP State President Jayant Patil from Sonali Tanpure

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.