BMC Budget 2022: बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काहीच नाही, गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प; भाजपसह काँग्रेसचीही शिवसेनेवर टीका

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आयुक्तांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.70 टक्क्याने वाढीव असा हा अर्थसंकल्प आहे.

BMC Budget 2022: बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काहीच नाही, गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प; भाजपसह काँग्रेसचीही शिवसेनेवर टीका
बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काहीच नाही, गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प; भाजपसह काँग्रेसचीही शिवसेनेवर टीका
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:49 PM

मुंबई: महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा महापालिकेचा अर्थसंकल्प (bmc budget)सादर केला आहे. आयुक्तांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.70 टक्क्याने वाढीव असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं सत्ताधारी शिवसेनेने (shivsena) स्वागत केलं आहे. तर भाजपसह काँग्रेसने या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काहीच नाही. मुंबईकरांना गुलाबी स्वप्न दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजप आणि काँग्रेसने केली आहे. हा दिवाळखोरीतील अर्थसंकल्प आहे. ऊर्दू भवन बांधणाऱ्यांना या अर्थसंकल्पात मराठी भवन आणि डबेवाला भवनाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही, अशी टीका भाजपने केली आहे. तर कचरा करणाऱ्यांकडून वापरकर्ता शुल्क आकारण्यात येण्याच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावरून येणाऱ्या काळात महापालिका स्थायी समितीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेचे गटनेते आणि भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. गुलाबी स्वप्न दाखवणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. अर्थसंकल्पात जकातीपोटी नुकसान भरपाई 11 हजार 429 कोटी गृहीत धरलेली आहे. आज पाच वर्षांनंतर ही नुकसान भरपाई महापालिकेला यापुढेही मिळणार आहे का? राज्य शासनाने तशी ग्वाही दिली आहे का? या प्रश्नाचे कुठलेही उत्तर या अर्थसंकल्पात मिळत नाही. सर्वसामान्य मुंबईकरांची या अर्थसंकल्पाकडून घोर निराशा झाली आहे. केवळ हा चुनावी जुमला संकल्प असून कधीच अंमलबजावणी न होणाऱ्या पोकळ घोषणा देण्याची परंपरा यावेळीही कायम सुरू ठेवली आहे., अशी टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

शहरातील अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडला आहे. तर भांडवली तरतुदींपैकी केवळ 40 % खर्च झाला असून गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. गोरेगांव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प गेली चार वर्षे रखडला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पातील निधीचा विनियोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ता रुंदीकरण आणि मलनिस्सारण प्रकल्पालाही गती मिळालेली नाही, आदी विविध मुद्द्यांवरही शिंदे यांनी यावेळी लक्ष वेधले.

सूजलेला अर्थसंकल्प

आज सादर केलेला मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सूजलेला आहे. उत्पन्नात प्रत्यक्षात वाढ करण्यासाठी कुठलीही उपाययोजनांबाबत उल्लेख न करता अंतर्गत कर्ज आणि राखीव निधीतून तब्बल 69% उचल करून विकास कामे कशी पूर्ण होणार? हा अर्थसंकल्प राखीव निधीतून उचल करून मुंबई पालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा आहे. भांडवली विकासकामांचे कागदी घोडे नाचवणारा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात बोलाचीच कढी’ असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली.

डबेवाला भवनाचा विसर

बेस्टच्या अर्थसंकल्पाला 6 हजार 800 कोटींची अनुदान देण्याचा ठराव स्थायी समिती पंधरा दिवसापूर्वी मंजूर करते; पण या अर्थसंकल्पात केवळ 800 कोटी देण्याचे सूतोवाच आयुक्त करतात! म्हणजे बेस्टला खड्ड्यात घालणारा हा अर्थसंकल्प आहे. उर्दू भवन बांधणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठी भाषा भवन, वारकरी भवन, डबावाला भवनचा विसर पडला आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.

बोगस अर्थसंकल्प

आजचा पालिकेचा अर्थसंकल्प बोगस आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कोस्टलला प्राधान्य का?

बजेटमध्ये फक्त मुंबईकरांना स्वप्न दाखवण्यात आलं आहे. त्यात नवं काही नाही. कचरा निर्मिती करणाऱ्यांना शुल्क आकारलं जाणार आहे हे चुकीचं आहे, असं सांगतानाच रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाचा बजेट कमी केला आहे. मग कोस्टल रोडला प्राधान्य का? असा सवाल काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. कोस्टल रोडला विरोध नाही, पण त्याला प्राधान्य कशाला? असा सवाल करतानाच हा बजेट मुंबईकरांच्या हिताचा नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

मुंबईच्या प्रगतीसाठीचा अर्थसंकल्प

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. बीएमसीने आजचा अर्थसंकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2022-23साठी भरघोस वाढ सूचवली, ही वाढ गेल्याबवर्षीच्या तूलनेत 17 टक्क्यांनी आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्यावर भर दिला आहे. कोरोना काळात बिकट अवस्था असतानाही असं बजेटमध्ये वाढ केली आहे, असं यशवंत जाधव म्हणाले. महापालिकेचा महसूल वाढेल यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही स्वयंघोषित विरोधी पक्षनेत्यांनां चिंता होती. पण त्यांना डावलून शिवसेनेने वचन नाम्यात दिलेली वचन पूर्ण केली आहेत. त्यामुळे यापुढेही मुंबईकर शिवसेनेला सेवा करण्याची संधी देतील अशी अपेक्षा आहे. हा अर्थसंकल्प चांगला असून सर्व सामान्यांना त्रास देण्यात आलेला नाही, असंही जाधव म्हणाले.

केंद्राच्या बजेटसारखा निराश करणारा बजेट नाही

महापालिकेचा आजचा बजेट हा प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ग्रीन फायनान्स आहे, पर्यावरणासाठी भरीव तरतूद आहे. पुढे चला मुंबई… हा नारा घेऊन पुढे जायचे आहे. मुख्यमंत्री हे मुंबईचे असल्याने बजेटमध्ये मुंबईसाठी चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. त्या बजेटमध्ये दिसत आहेत. मुंबईचा शाश्वत विकास करणारा हा बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या बजेटमध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या बजेटमधून नैराश्य दिसलं तसा हा बजेट नाही. हा बजेट प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून, मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बनवला आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

BMC BUDGET: मुंबई महापालिकेचा डिजीटल शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांना मसूरडाळ, हरभरे आणि तांदूळही देणार

BMC Budget 2022: सर्वांना पाणी, घराशेजारीच आरोग्य केंद्र, कचरा करणाऱ्यांकडून ‘वापरकर्ता शुल्क’ आकारणार; निवडणुकीच्या तोंडावर पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

Maharashtra News Live Update : दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनचं होणार : बोर्ड

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.