यह तो अंगडाई है, आगे और लढाई है; भाजपचं मुंबईत आंदोलन; आघाडीतील सगळे मंत्री जेलमध्ये जाणार

सरकारवर टीका करत असताना नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी राष्ट्रद्रोहाचा मुद्दाही उपस्थित केला.यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जातीयतेचे राजकारण बंद करा म्हणत यह तो अंगडायी है, आगे और लढाई है म्हणत त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

यह तो अंगडाई है, आगे और लढाई है; भाजपचं मुंबईत आंदोलन; आघाडीतील सगळे मंत्री जेलमध्ये जाणार
भाजपचं मुंबईत आंदोलनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:45 PM

मुंबईः भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका करुन मंत्रा नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप (BJP) शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात काय केले असेल तर पोलिसांकडे लाच घेणे, भ्रष्टाचार करणे असे सगळे गुन्हे मंत्र्यांकडून झाले असल्याचे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले. सरकारवर टीका करत असताना नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी राष्ट्रद्रोहाचा मुद्दाही उपस्थित केला.यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीयतेचे राजकारण बंद करा म्हणत यह तो अंगडाई है, आगे और लढाई है म्हणत त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

मलिक यांचा राजीनामा आम्ही का मागत आहोत तर 1993 साली जो बॉम्ब झाला त्याच्या वेदना येथील जनतेच्या ताज्या असतानाच आणि ज्या लोकांनी बॉम्ब स्फोट घडवून आणले त्यांच्याबरोबर तुम्ही जर व्यवहार करत असाल तर देशविरोधी गतिविधी होण्यात तुमचाही हात असल्याचे सांगत त्यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणि सरकारवर टीका केली.

सरकारमधील मंत्र्याला दोन बायका

निवडणूक आयोगाला जे लोकप्रतिनिधी माहिती देतात, त्यामध्ये माहिती भरताना सत्य माहिती भरावी लागते, मात्र या सरकारमधील मंत्र्याला दोन बायका असतानाही त्याची नोंद कुठे केली जात नाही, ते जाहीरपणे सांगतात की, माझ्यापासून दोन मुलं झाली आहेत अशी टीका मंत्री धनंजय मुंडे यांची नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

वर्षाला मला शंभर कोटी  द्या

गृहमंत्री असताना ज्या अनिल देशमुख यांनी पोलिसांनाच सांगितले की, वर्षाला मला शंभर कोटी जमा करुन द्या असं त्या खात्याचा मंत्रीच पोलिसांना सांगत असेल तर भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे तर सरकारमधील एक मंत्री शंभर कोटीचे रिसॉर्ट बांधतात, आणि एक मंत्री देशविरोधी कारवाया करणाऱ्यांबरोबर व्यवहार करतात, त्यामुळे यापासून राष्ट्राला खरा धोका आहे असंही त्यांनी सांगितले.

नेत्यांना तोंड दाखवणं अवघड होईल

किरीट सोमय्यांनी उघड केलेले भ्रष्टाचार हे गंभीर असून त्यांच्यावर कारवाई करा, तसेच यावेळी त्यांनी 1993 झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती घेऊन तत्कालीन नरसिंह राव यांनी चौकशी समिती नेमली. त्या नेमलेल्या समितीने जो अहवाल सरकारकडे सादर केला आहे. तो अहवाल जर घोषीत केला गेला तर अनेक नेत्यांना तोंड दाखवणं अवघड होईल असंही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार आणि घोटाळे टोकाला गेले असल्यानेच संजय राऊत यांनी सांगितले की, माझी रॉयल्टी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त असल्याचे सांगतात. संजय राऊत यांच्याकरवीच देशाचे नेते म्हणवून घेणाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंची आसन ढळमळीत करायंच प्रयत्न केला जात असल्याची टीका शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर करण्यात आली.

सगळे तुरुंगात जाणार

भ्रष्टाचार आणि आघाडी सरकारमधील मंत्री सगळे तुरुंगात जाणार असल्यानेच हे सरकार टिकणार नाही, या सरकारने भाजपमधील अनेक नेत्यांचे दमन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही सरकारमधील काही नेते आणि मंत्री निदर्शने करत आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्रीही निदर्शनाला बसले. या सरकारने भाजपमधील ज्या नेत्यांना त्रास दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्या 27 केसमधील एकही केस हे सरकार जिंकले नाही.

भेकड शिवसैनिकांचा सोमय्यांवर हल्ला

महाविकास आघाडीवर टीका आणि त्यांचे भ्रष्टाचार उघड केल्यानेत भेकड शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवर हल्ला केला. पण आता भाजप शांत बसणार नाही. ही भाजप आता पूर्वासारखी राहिली नाही असा इशाराही त्यांनी आघाडी सरकारला यावेळी दिला.

प्रत्येक मंत्री भ्रष्ट

आघाडी सरकारमधील प्रत्येक मंत्री भ्रष्ट असून आता त्यांना आता जायची वेळ आली आहे असे म्हणत त्यांनी आत तुरुंगात जाण्यासाठीच मंत्र्या मंत्र्यांमध्ये चढाओढ लागेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. सरकारमधील काही लोकं देशाची गद्दारी करण्याचच काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा जो दरारा होता, तो आता शिवसेनेत राहिला नसल्याचे सांगितेल.

लोकांनी सत्तेवर बसवलं नाही

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही कोणाला भेटत नाहीत, तसेच त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आहेत. आणि हे सरकार लोकांनी निवडून दिले नाही, यांना लोकांनी सत्तेवर बसवलं नाही असा जोरदार हल्ला त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केला.

मंत्री जेलमध्ये जाणार

चंद्रकांत पाटील यांनी या सरकारमधील घोटाळे, भ्रष्टाचार आणि मंत्री जेलमध्ये जाणार असा इशारा देत पुराव्याच्या आधारे आम्ही घोटाळे बाहेर काढू, आणि किरीट सोमय्या यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा राहू असा विश्वासही त्यांनी किरीट सोमय्यांनी दिला. तर शरद पवार यांनी राज्यातील जातीयतेचे राजकारण बंद करा म्हणत त्यांनी यह तो अंगडाई है, आगे और लढाई है म्हणत त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या

Maharashtra Load shading | राज्यात कोळशाचा तुटवडा, भारनियमनाची दाट शक्यता, काय म्हणाले ऊर्जा मंत्री Nitin Raut?

Sanjay Raut : शाळेत मराठी सक्तीची नसावी यासाठी सोमय्या कोर्टात गेले होते, संजय राऊतांची माहिती

kolhapur north assembly bypoll: महाविकास आघाडीचे नेते डबल ढोलकी, गावांच्या हद्द वाढीवरून चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.