गणेश नाईकांना हादरा, आधी तीन भाजप नगरसेवक सेनेत, आता दोघांच्या हाती ‘घड्याळ’

नवी मुंबईत (Navi Mumbai) भाजप नगरसेविका दिव्या गायकवाड (Divya Gaikwad) यांनी माजी नगरसेवक पतीसह राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला

गणेश नाईकांना हादरा, आधी तीन भाजप नगरसेवक सेनेत, आता दोघांच्या हाती 'घड्याळ'
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 3:11 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजप नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. भाजप नगरसेविका दिव्या गायकवाड (Divya Gaikwad) आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. (BJP Corporator Divya Gaikwad joins NCP ahead of Navi Mumbai Municipal Elections)

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक 64 मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनी भाजप प्रवेश केला होता. मात्र आता गायकवाड दाम्पत्याने राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले आहे.

गणेश नाईकांना मोठा धक्का

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गळती सुरुच आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यातच नाईक समर्थक असलेले भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. शिवसेनेने धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही भाजपला ‘धक्के पे धक्का’ दिला आहे.

कोण आहे गायकवाड दाम्पत्य?

वैभव गायकवाड यांना 2010 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. तर 2015 मध्ये दिव्या गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. दोन्ही वेळा दोघंही जण मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुका शरद पवार यांच्या नेतृत्वात लढण्याची घोषणा गायकवाड पती-पत्नीने केली.

नवीन गवते , दीपा गवते आणि अपर्णा गवते या नगरसेवकांनी गेल्याच आठवड्यात भाजपला सोडसिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधलं होतं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. याआधी खुद्द गणेश नाईक हे भाजप सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्यांनी या अटकळी फेटाळून लावल्या.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, तीन नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन

राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?

(BJP Corporator Divya Gaikwad joins NCP ahead of Navi Mumbai Municipal Elections)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.