भाजपनं प्रभू रामाची मूर्ती उभारली, शिवसेना नेत्या म्हणतात यांनी तर सीतेला वेगळं केलं!

श्रीराम हा सीतेशिवाय अपूर्ण वाटत नाही का? जर सीताहरण झाले नसते तर रावणाचा वध झाला असता का? |Priyanka Chaturvedi

भाजपनं प्रभू रामाची मूर्ती उभारली, शिवसेना नेत्या म्हणतात यांनी तर सीतेला वेगळं केलं!
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 10:01 AM

मुंबई: उत्तर प्रदेशातील भाजपच्या मुख्यालयात उभारण्यात आलेल्या रामाच्या पुतळ्यावरुन आता भाजप (BJP) आणि शिवसेनेत वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी ट्विटवरून भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रीरामाच्या (Ram) पुतळ्याची छायाचित्रे शेअर केली होती. मात्र, यामध्ये रामाच्या बाजूला सीता नसल्याचे सांगत अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. (Shivsena leader priyanka chaturvedi slams BJP)

नेमका हाच धागा पकड शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी भाजपला लक्ष्य केले. श्रीराम हा सीतेशिवाय अपूर्ण वाटत नाही का? जर सीताहरण झाले नसते तर रावणाचा वध झाला असता का? या सत्याच्या लढ्यात सीतेचे काहीच योगदान नव्हते का? परंतु, भाजपमधील पुरुषप्रधान मनोवृत्तीची मजल राम आणि सीतेला वेगळे करण्यापर्यंत पोहोचली आहे. रावणानेही हेच केले होते. हे सर्व पाहून दु:ख होत असल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपकडून शिवसेनेच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

बॅनर फाडल्यानंतरही कारवाई नाही; जाब विचारण्यासाठी भाजप नेते पोलीस स्टेशनमध्ये जाणार

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी भाजपच्या नेत्यांकडून देशभरातून देणगी गोळा केली जात आहे. या मोहीमेच्या जनजागृतीसाठी मालाडच्या मालवणी परिसरात काही बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, काही समाजकंटकांनी हे बॅनर्स फाडले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली होती. यावेळी भाजपचे विनोद शेलार, गणेश खनकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्यामुळे शनिवारी भाजपचे प्रमुख नेते पुन्हा एकदा मालवणी पोलीस ठाण्यावर धडकणार आहेत.

संबंधित बातम्या:

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ

राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक

(Shivsena leader priyanka chaturvedi slams BJP

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.