मुंबई: भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. (BJP have hidden agenda about reservation system says NCP leader Nawab Malik)
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंडल आयोग आल्यानंतर भाजप त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
मराठा आरक्षणाच्याविरोधात (Maratha Reservation) भाजपकडूनच रसद पुरवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला होता. ‘वन मेरिट, वन नेशन’, ही संस्था मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. या संस्थेचे सर्व प्रमुख हे भाजपचे पदाधिकारी आहेत. या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात वकील नेमून लढा दिला. त्यामुळे लोकांनी आता खरा शत्रू कोण आहे, हे ओळखावं, असे त्यांनी म्हटले होते.
भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे. याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच असल्याचा आरोप मध्यंतरी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
पदोन्नतीतील आरक्षणासाठी नितीन राऊत आक्रमक, सरकारला धोका आहे का? राऊत म्हणतात….
भाजपनेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? : सचिन सावंत
पदोन्नतीमध्ये पुन्हा आरक्षण लागू केल्यास रस्त्यावर उतरु; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
(BJP have hidden agenda about reservation system says NCP leader Nawab Malik)