महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…

"उबाठा सेना आता बास झालं. येणाऱ्या निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना आपण मतदान करायचं आहे. मला ते बोलावतील की माहिती नाही. पण स्वइंजिन पोहचवायचं आहे", असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेची शिवडी मतदारसंघापुरता महायुती होताना दिसत आहे.

महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण...
आशिष शेलार आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:11 PM

मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण निवडणूक लढवेल? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. कारण भाजप नेते आशिष शेलार यांनी आजच्या शिवडी येथील मेळाव्यात मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजय चौधरी या मतदारसंघातून दोन वेळा जिंकून आले आहेत. असं असलं तरी आता अजय चौधरी यांना बाळा नांदगावकर यांचं कडवं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप ठाकरे गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात मोठा राजकीय गेम खेळला आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार अजय चौधरी यांच्या पराभवासाठी भाजपने राज ठाकरे यांचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा जाहीर करत असताना भाजपचा केवळ शिवडी या एकमेव मतदारसंघापुरता मनसेला पाठिंबा असेल, महाराष्ट्रात नसेल, असंदेखील आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केलं.

“मनसेला आमचा पाठिंबा हा महाराष्ट्रात नाही तर केवळ शिवडी मतदारसंघापुरता मर्यादीत आहे. आपण इथं खूप वेळापासून बसलेला आहात. पाणी देखील नाही. आपणही विरोधकांना इथं पाणी पाजल्याशिवाय शांत बसायचं नाही. आज शिवडीतील जनतेसमोर आपल्या भूमिकेबद्दल खुलासा झाला पाहिजे. शिवडी विधानसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार द्यायचा होता. पण इथे आपला उमेदवार नाही. आपले मुंबईतील 36 पैकी 35 ठिकाणी उमेदवार आहेत. इथे उबाठा आणि मनसेचे उमेदवार आहेत. मग आपण काय करायचं? मतदान करणाऱ्या सर्वांच्या डोक्यात सुरु आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

‘अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही’

“ज्यांना या विधानसभेचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी 2014 आणि 2017 चा अभ्यास करायला पाहिजे. त्यात आम्ही 10 दिवसात अनेक मत घेऊ शकलो. नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आपण यश घेतलं. आताही भाजपा जी भूमिका घेईल त्यातच यश निश्चित आहे. आम्हाला सर्व विचारत आहेत, साहेब एकदा भूमिका सांगा. गावाकडे लग्न सुरु आहे आणि आम्हाला नाचता येईना. एका अपक्ष उमेदवार सोशल मीडियावर भाजपचे समर्थन आहे, असं दाखवत होता. त्याला आपला पाठिंबा नाही, परस्पर भूमिका घेतली. पण अरे बाबा तू बोलशील की नाही? कोणतीही चर्चा न करता पक्षाची भूमिका कशी देणार? अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही”, असं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

‘ही भूमिका केवळ शिवडीपुरता मर्यादीत’

“मी आता फक्त शिवडीपुरता बोलत आहे. ते राज्यभर घेऊन जाऊ नका. मी माहीमबद्दल बोललो आणि महाराष्ट्रभर घेऊन गेले. आता भूमिका केवळ शिवडीपुरता मर्यादीत असेल. एक तर अजय चौधरी नाहीतर, बाळा नांदगावकर आणखी काही पर्याय तर नाहीत. नोटा आपला विषय नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे. विचारधारेवर आपल्याला पुढे चालायचं आहे. काही जुने मित्र आहेत. त्यांनी आपल्याला संपर्क केला नाही. पण उद्धवजी तुम्ही दगाबाजी केलीत. महाराष्ट्राच्या इतिहासात दगाबाज म्हणून नोंद ठेवायची तर उद्धवजी तुमचं नाव पहिले येईल”, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलारांचा ठाकरेंवर घणाघात

“उद्धवजी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला गेले. पण शिवडीतील वारकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी पंढरपूरला जाऊनही पांडुरंगाच्या पायाला हातही लावला नाही. तुळशीची माळ माझ्या गळ्यात पडली तर स्वर्ग सुखाचा आनंद होतो पण उद्धवजी यांनी ती माळ स्वीकारली नाही. कोरोना काळात उद्धवजी यांनी मंदिर बंद केली. गर्दी होऊ नये म्हणून केली मान्य आहे. पण रेशन दुकानात खडूने गोल करून लोक रेशन घेत होते. मग दर्शन का घेऊ शकत नव्हते? आमची तुमच्या सोबत जिवंत युती होती. काँग्रेसने सावरकरांचा वारंवार केलेला अपमान उद्धवजी त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत. पालघर साधू हत्यांमध्ये तुम्ही साधी केस CBI कडे देऊ शकला नाहीत. शर्जील उस्मानीसमोर पायघड्या घालणारे तुमचे सरकार”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

‘चाटुगिरी केलीत म्हणून तुम्ही आता भोगताय’

“अजय चौधरी यांना तिकीट दिलं. मग सुधीर साळवी समर्थक नाराज झाले. हे सर्व सुरु होतं. तो माझा मुद्दा नाही. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कोरोना काळात गणेशोत्सव हे होऊ देत नव्हते. पण मी मिटिंगला सांगितलं भक्तांना देवापासून तोडू नका. सुधीर साळवी तुम्ही भोगताय ना तिकीट का मिळालं नाही हे? मी बोलणार नाही. पण तुम्ही त्यावेळी चाटुगिरी केलीत म्हणून तुम्ही आता भोगताय. त्यावेळी तुम्ही उद्धव ठाकरे यांना काय वाटेल त्याचा विचार केलात, त्याचे भोग साळवीने भोगलेत. आता 23 तारखेला अजय चौधरी भोगतील”, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.