शिवसेनेच्या गडात भाजपचा मराठी कट्टा, कोळीवाड्यात आशिष शेलारांचं सेनेवर टीकास्त्र

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या (Shivsena) गडात असलेल्या वरळी कोळीवाडा मुंबई येथे मराठी कट्टा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

शिवसेनेच्या गडात भाजपचा मराठी कट्टा, कोळीवाड्यात आशिष शेलारांचं सेनेवर टीकास्त्र
आशिष शेलार Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 9:41 PM

मुंबई : चार राज्यांचा निवडणूक जिंकल्या नंतर भाजप (BJP) आता मुंबई मनपा (BMC) निवडणुकीसाठी कामावर लागली असा पाहायला मिळतेय. भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या (Shivsena) गडात असलेल्या वरळी कोळीवाडा मुंबई येथे मराठी कट्टा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आमदार आशिष शेलार, आमदार सुनील राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. भारतीय जनता पार्टी मुंबई मध्ये मराठी कट्टा हा कार्यक्रम करत आहे. मराठी माणसाच्या समस्या आम्ही जाणून घेत आहे. आमचं मुंबई मनपा निवडणुकीसाठी मराठी माणसासाठी वचन आहे की गावठाण आणि कोळीवाडा चे आम्ही रक्षक असणार आहे.

दोन मजली घर बनवायचं असल्यास टेबलाखालून पैसे मोजावे लागतात

मुंबईचा मराठी माणसाची अवस्था काय आहे. मुंबईच्या आमच्या गिरणी कामगारांच्या जागा बिल्डरांना कोणी विकल्या असा सवाल आशिष शेलार यांनी केला. आम्ही गावठाण आणि कोळीवाडा रक्षक म्हणून काम करणार आहे. मुंबईवर 25 वर्ष एक पार्टी एक परिवार राज्य करतेय.मुंबईच्या कोळीवाड्याला आराखड्यामध्ये स्थान दिले नाही. 2022 पर्यंत एकाही कोळीवाड्याचं सीमांकन झालं नाही. कोळीवाडा मध्ये दोन मजले घर बनवायचं असेल तर टेबल खालून पैसे मोजावे लागतात असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

कोस्टल रोडमुळं मच्छीमार समुद्रात जाऊ शकणार नाहीत

घराच्या पुनर्वसन साठी नियम तयार केले नाहीत. आम्ही प्रश्न विचारतो तर त्यांना राग येतो. आमच्या मच्छिमार भगिनीला लायसेन्स दिले नाही. आमच्या मासेमारी बांधवाना आंदोलनात उतरवलं. कोस्टल रोड मुळे ते समुद्रात जावू शकणार नाहीत. इथल्या आमदारांनी कोळीवाडा येथे येऊन बैठक घेतलंय पाहिजे होतं परंतु व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. मराठी शाळा बंद झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी मराठी शाळेला मुंबई पब्लिक स्कुल असं नाव दिलं आहे. बोलायचं काय आणि करायचं काय हे खेळ सुरू आहे. 47 हजार कोटी रुपये मुंबई पालिकेचा बजेट आहे. एक वर्षाला पाच वर्षाला पकडलं तर त्यानी म्हटलं 2 लाख कोटी खर्च केले आहेत. मुंबईच्या कचऱ्यावर कोणी प्रक्रिया नाहीत. या मुंबईची ओळखची हे काय केलेय हे आपण सर्व बघतो आहोत. शिवसेनेची सत्ता असून देखील लालबागचा राजा एक वर्ष बसला नाही, असंही शेलार म्हणाले.

कोळीवाड्यातील मराठी माणसाला हक्काचं घर मिळावं

भाजप आमदार सुनील राणे यांनी या मराठी कट्टाच्या निमित्ताने आम्ही भेटतो. मुंबई आपल्या मराठी बांधवांची आहे. मराठी लोकांमध्ये बसून चर्चा करण्याचं व्यासपीठ मराठी कट्टा आहे. मुंबई शहरामध्ये मराठीची ओळख असली पाहिजे या साठी भाजपने मराठी कट्टाची सुरुवात केलीय. काही लोक हे स्वतः ला मराठी म्हणतात. कोळीवाडा मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला हक्काचा घर मिळालं पाहिजे, असं सुनील राणे म्हणाले.

इतर बातम्या:

Rain : पुणे अहमदगर ते वाशिम नांदेडमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

मुंबईचा महापौर भाजपचा तर उपमहापौर रिपाईचा असणार, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

BJP Leader Ashish Shelar slam Shivsena at Marathi Katta programme

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.