Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, पण…..

आजपर्यंत काँग्रेस किती नंबरी आहे हे जनतेने पाहिले आहे. | Ashish Shelar

आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, पण.....
Ashish Shelar
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 7:35 PM

मुंबई: राज्यात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा निर्धार करणाऱ्या नाना पटोले यांना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टोला लगावला. होय काँग्रेस पहिल्या क्रमांकाच पक्ष होऊ शकतो, पण तो लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूक या गोष्टींमध्ये असेल, अशी खोचक टिप्पणी आशिष शेलार यांनी केली. (Ashish Shelar take a dig at congress)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना नाना पटोले यांच्या निर्धाराविषयी विचारण्यात आले असता शेलार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आजपर्यंत काँग्रेस किती नंबरी आहे हे जनतेने पाहिले आहे. अशा नंबरी काँग्रेसला अजून नंबरी करण्याचे काम नवे अध्यक्ष करणार असतील तर वर्षानुवर्षे काँग्रेसने चालवलेला धोकाधडी, भ्रष्टाचार, लबाडीच्या कार्यक्रमातील नंबर त्यांना वरचा नक्की मिळेल, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी पटोले यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांना समोरे जाण्यासाठी भाजपने 18 ते 25 वयोगटातील तरुणांची युवा वॉरियर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषदांचं आयोजन केलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील 40 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच केंद्रीय पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात घ्यावयाच्या आंदोलनावरही चर्चा करण्यात आली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

संबंधित बातम्या:

मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, नाना पटोलेंचा दिल्लीत निर्धार

नाना पटोले म्हणतात, काँग्रेसला नंबर 1चा पक्ष बनवणार पण कसे?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

(Ashish Shelar take a dig at congress)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.