छटपूजा साजरी करण्यासाठी भाजप आग्रही; मुंबईत शिवसेना-भाजपचा ‘सामना’ रंगणार

राज्य सरकारने मंदिरे उशीरा उघडली आणि आता छटपूजेलाही परवानगी नाकारली आहे. | Atul Bhatkhalkar

छटपूजा साजरी करण्यासाठी भाजप आग्रही; मुंबईत शिवसेना-भाजपचा 'सामना' रंगणार
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 11:15 AM

मुंबई: राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सार्वजनिक ठिकाणी छटपूजेच्या उत्सवाला (Chhath Puja) परवानगी नाकारल्यानंतर आता भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. दिवाळीपूर्वीच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छटपूजा साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, तरीही सरकारने ही परवानगी नाकारली. आम्ही शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेचा निषेध करतो, असे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. (Atul Bhatkhalkar slams Shivsena over denies permission for Chhath Puja)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी छटपूजेच्या मुद्द्यावरून भाजप आगामी काळात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले. राज्य सरकारने मंदिरे उशीरा उघडली आणि आता छटपूजेलाही परवानगी नाकारली आहे. हे सरकार हिंदूविरोधी आहे, आम्ही त्याचा निषेध करतो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

अतुल भातखळकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईत छटपूजेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचा टक्का पाहता छटपूजेवरून कायम राजकारण रंगते. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे भाजपकडून छटपूजेचा मुद्दा उचलण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

येत्या शुक्रवारी व शनिवारी म्हणजेच दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्र किंवा नदी किनारी छटपूजा आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. पालिकेने त्याबाबतची नियमावली मंगळवारी जाहीर केली होती.

त्यानुसार छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर बंधी घालण्यात आली आहे. समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – 19’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही. त्यामुळे सामूहिक छटपूजेची परवानगी देता येणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले होते.

संबंधित बातम्या:

मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली

‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल’

मुंबईचा गड जिंकण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; फडणवीस- चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक

(Atul Bhatkhalkar slams Shivsena over denies permission for Chhath Puja)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.