सरकारचाच फ्यूज उडालाय, जनता धडा शिकवेल : चित्रा वाघ

जनता नक्की धडा शिकवेल," अशी टीका चित्रा वाघ यांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर केली. (Chitra Wagh Comment On Electricity Bill Issue) 

सरकारचाच फ्यूज उडालाय, जनता धडा शिकवेल : चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:44 PM

कल्याण : “सरकारचाच फ्यूज उडाला आहे. अनेक लोकांना 50 हजारांपेक्षा जास्त वीजबिलं आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल,” अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर केली. (Chitra Wagh Comment On Electricity Bill Issue)

अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरातील हळदी कुंकू कार्यक्रमात चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

“सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जी वेळ दिली ती फार चुकीची आहे. अनेकांचे ऑफिसेस हे दहाला सुरू होतात. संध्याकाळी बंद होतात. त्यामुळे सरकारने लोकलच्या वेळेमुळे नोकरदार वर्गाला काहीही फायदा होणार नाही,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

यावेळी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना आमदार होण्याच्या शुभेच्छा चित्रा वाघ यांनी दिल्या. मात्र कोणत्या पक्षातून कुणाल पाटील यांनी आमदार व्हावं, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला असता त्या म्हणाल्या, कुणाल पाटील हे स्वत: प्रगल्भ आहेत. त्यामुळे ते त्यांचा निर्णय स्वत: घेतील, असे त्यांनी म्हटले.

नोटिशीची मुदत 30 जानेवाराली संपणार

ग्राहकांनी वीजबिल न दिल्यामुळे महावितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महसुली तूट वाढल्यामुळे महावितरणला आपला कारभार करण्यासाठी कसरत करावी लागतीये. त्यामुळे सरकारने थकित वीजबिलाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल 71 लाख 68 हजार 596 विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आले आहे.

वीजबिल न भरल्यास वीज कापणार

निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास विजजोडणी कापण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. वीजबिल भरण्यासाठीची मुदत 30 जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर विजेची जोडणी कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत.  (Chitra Wagh Comment On Electricity Bill Issue)

संबंधित बातम्या : 

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

‘मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला’, विनायक राऊतांचा टोला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.