‘चॅनलमधल्या मुली शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?’, सुप्रिया सुळे यांचा सवाल, चित्रा वाघ यांची ‘सोलण्या’ची भाषा

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन वाद शमला असताना आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीबद्दल केलेल्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत निशाणा साधलाय.

'चॅनलमधल्या मुली शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?', सुप्रिया सुळे यांचा सवाल, चित्रा वाघ यांची 'सोलण्या'ची भाषा
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 7:06 PM

मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका पत्रकार तरुणीला आधी टिकली लाव, मग प्रतिक्रिया देईन, असं म्हटल्याने त्यांच्याविरोधात सर्वच स्तरावरुन टीकेची झोड उठली होती. राष्ट्रवादी काँग्रेसपासून, काँग्रेससह विविध पक्षाच्या नेत्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला होता. भिडे यांच्या वक्तव्यावरुन वाद शमला असताना आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीबद्दल केलेल्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत निशाणा साधलाय.

सुप्रिया सुळे आज पुण्यातील पिंपरी येथील पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार तरुणी आणि महिलांच्या पोषाखाबद्दल विधान केलं. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी या पाश्चिमात्य कपडे परिधान करतात. पण त्यापेक्षा त्या साडी नेसून मराठी संस्कृतीचं जतन का करत नाहीत? अशा प्रकारचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय.

सुप्रिया सुळे यांच्या साडीबद्दलच्या विधानाचा व्हिडीओ चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असंदेखील त्या म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे व्हिडीओत नेमकं काय म्हणाल्या?

“मला खूप वेळा गंमत वाटते की, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना तुम्ही? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टनाईजेशन करतोय”, असं सुप्रिया सुळे संबंधित व्हिडीओ बोलताना दिसत आहेत.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.