Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा मैदानात, उद्धव ठाकरे यांच्यावर केला भ्रष्टाचाराचा मोठा आरोप

Kirit Somaiya | किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची प्रकरण, आर्थिक घोटाळे खणून काढण्यासाठी ओळखले जातात. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा मैदानात, उद्धव ठाकरे यांच्यावर केला भ्रष्टाचाराचा मोठा आरोप
Kirit Somaiya-uddhav thackeray
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 11:13 AM

मुंबई : भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची प्रकरण, आर्थिक घोटाळे खणून काढण्यासाठी ओळखले जातात. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हॉस्पिट बांधण्याचे कंत्राट

उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.

भाड्यापोटी किती कोटी दिले?

7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 90 कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी 10 कोटी रुपये दिले असे मिळून 100 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 700 कोटी रुपये भाडे घोटाळे

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असा सुद्धा आरोप आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.