शिवजयंतीवर शिवसेनेचे आणखी एक लोटांगण, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी जयंती उत्सावानिमित्ताने काही निर्बंध जाहीर केले आहेत. यावरुन भाजपने ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय.

शिवजयंतीवर शिवसेनेचे आणखी एक लोटांगण, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका
केशव उपाध्ये, भाजप प्रवक्ते
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 2:10 AM

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी जयंती उत्सावानिमित्ताने काही निर्बंध जाहीर केले आहेत. यावरुन भाजपने ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेने शिवजयंतीवर निर्बंध लादून आणखी एक लोटांगण घेतल्याची टीका केलीय. “सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ चा नवा प्रयोग सादर केला आहे,” अशी टीका भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे (BJP leader Keshav Upadhye criticize Thackeray Government).

केशव उपाध्ये म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा ‘रंग’ दाखवला आहे. हिंदू समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीला अटक करण्यास महाआघाडी सरकार टाळाटाळ करते. सत्ता टिकवण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने ‘घालीन लोटांगण’चा आणखी एक प्रयोग महाराष्ट्रात सादर केला आहे.”

“शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. दारूची दुकाने, नाईटलाईफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत,” असं केशव उपाध्ये म्हणाले.

“धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागे पुढे पहात नाही. मात्र शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यात का खुपते?” असा सवालही उपाध्येंनी ठाकरे सरकारला विचारलाय.

हेही वाचा :

कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यावर नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार : अमित शाह

भाजपच्या विखारी प्रचाराला महाराष्ट्र काँग्रेसचे 2 लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार : नाना पटोले

ठाकरे सरकार नशा बहाद्दरांचे आहे की उत्सवप्रेमींचे; आशिष शेलारांची घणाघाती टीका

व्हिडीओ पाहा :

BJP leader Keshav Upadhye criticize Thackeray Government

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.