Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आणखी आक्रमक

त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असे सोमय्या यांनी म्हटले. | Kirit Somaiya

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आणखी आक्रमक
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 7:49 AM

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या अटकेनंतर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सचिन वाझेला अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असे सोमय्या यांनी म्हटले. (Take resignation of anil deshmukh and parambir singh in mansukh hiren case)

किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात रविवारी ट्विट करुन भाष्य केले. सचिन वाझे हे शिवसेनेचे प्रवक्त होते. त्यामुळे आता ओसामा सचिन वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार, हे आता बघावे लागेल. याप्रकरणात आणखी काही गोष्टी लवकरच समोर येतील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी ते अनेकवेळा आयुक्त परमबीर सिंह यांना भेटले होते. या दोघांत दीर्घकाळ चर्चाही झाली होती. तर विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांनी केवळ सचिन वाझे यांची बदली केली होती. त्यामुळे विरोधक प्रचंड संतापले होते.

सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या चौकशीनंतर बेड्या

मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा NIA कडून अटक करण्यात आली. जवळपास 13 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेंवर कोणते आरोप?

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

एटीएसने मनसुख यांच्या वकिलाचा जबाब नोंदवला, के. एच, गिरींकडून वाझेंबाबत मोठे गौप्यस्फोट

maharashtra state corona update | राज्यात तब्बल 15 हजार नवे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं कारण समोर?

(Take resignation of anil deshmukh and parambir singh in mansukh hiren case)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.