अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, वांद्रे पूर्वच्या कार्यालयावर तोडक कारवाईचे लोकायुक्तांचे आदेश, किरीट सोमय्यांची माहिती

मविआ सरकारमधील परिवहन मंत्री आणि ऊद्धव ठाकरे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट तोडल्या नंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा अनिल परब यांच्या बांद्रातील ऑफिसकडे वळवलाय.

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, वांद्रे पूर्वच्या कार्यालयावर तोडक कारवाईचे लोकायुक्तांचे आदेश, किरीट सोमय्यांची माहिती
किरीट सोमय्या, अनिल परब
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 6:11 PM

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई हणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय.

ऊद्धव ठाकरेंचे राईट हँड अडचणीत

मविआ सरकारमधील परिवहन मंत्री आणि ऊद्धव ठाकरे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट तोडल्या नंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा अनिल परब यांच्या बांद्रातील ऑफिसकडे वळवलाय. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 ऑक्टोबरला म्हाडाकडून कारवाई होणार असल्याचा दावा केलाय.

काय आहे प्रकरण ?

परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 2019 मध्ये केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधी नगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केले असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. याप्रकरणी चौकशी करून अनधिकृत बांधकाम तोडून संबंधित जागा नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली आणि त्याचा रिपोर्टही किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीही किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत जागेवर भेट देत तिथे मोठा गदारोळ घातला होता. ती दृष्य सगळ्यांनीच पाहिली होती. आत्ता गंमत पाहा, अनिल परब यांनी हे कार्यालय त्यांच्या नावे नसल्याचे म्हाडा अधिकर्यांना सांगितले आहे. त्यानुसार म्हाडा अधिकार्यांनी अनोळखी व्यक्तीच्या नावे ही नोटीस पाठवल्याची सुत्रांकडून माहीती मिळतेय. उच्च न्यायालयाच्याआदेशानुसार राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर 30 सप्टेंबर पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार म्हाडा आता केवळ नोटीस बजावत असून सरकारच्या आदेशाप्रमाणे या कार्यालयावर तोडक कारवाई होईल, असं बोललं जातं आहे. त्यामुळे आत्ता नेमकी कारवाई काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश

ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली, त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा ऊद्देश आहे. एखादा निकाल कुठलातरी आला की काही मंत्र्यांना असं वाटतं की चार दिन की चांदनी, करू द्या त्याला पाच पंधरा दिवस शेरो शायरी करू द्या. ज्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने तुरुंगात डांबलं ती केस ते प्रकरण अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ या मंत्रिमहोदयांना एवढेच सांगायचे की उड्या नका मारू 120 कोटी रुपये रोख मधून दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते तर कुठल्या नवनाथ घोटाळाचे होते का ते सांगा ? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते आणि आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे. मी म्हणालो ना चार दिन की चांदनी तिचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या, गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते करत असतील, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

इतर बातम्या:

नांदगावच्या सेना आमदाराची काल भुजबळांशी खडाजंगी, आज शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा

तीन पक्षांचं सरकार सांभाळणं हा महाविकास आघाडीचा प्राधान्यक्रम, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर; दरेकरांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya said Lokayukta order to Mhada take action on Anil Parab office at Bandra

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.