मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे, म्हणून आता याबाबत तक्रार नोंदवली, असेही कृष्णा हेगडेंनी सांगितले. (BJP Leader Krishna Hegde allegations against Renu Sharma)

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 5:58 PM

मुंबई : “मनसे कार्यकर्ते मनीष धुरी यांच्याशी देखील रेणू शर्मा असं वागली आहे. धुरी यांचा मला फोन आला होता,  ते सुद्धा हेच सांगत होते,” असे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी सांगितले. कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एका नवा वादाला तोंड फुटलं आहे. यासंदर्भात कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे. रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप हेगडे यांनी केला आहे. (BJP Leader Krishna Hegde allegations against Renu Sharma)

कृष्णा हेगडे काय म्हणाले?

“मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे. आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असे कृष्णा हेगडेंनी सांगितले

“मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते. ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणी असतं, सिंगर असतात, तेव्हा म्युझिक अल्बमसाठी पैशाची गरज असते,” असेही कृष्णा हेगडे म्हणाले.

“मी रेणुला दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करून रिलेशनशिपबाबत विचार असे, असा आरोपही कृष्णा हेगडेंनी केला. कोणा महिलेला बदनाम करून मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे. म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धंनजय मुंडे यांना मी ओळखत नाही,” असेही कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केले.  (BJP Leader Krishna Hegde allegations against Renu Sharma)

मनीष धुरी काय म्हणाले?

2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता, जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी २०१० मध्ये अनुभव घेतलाय, पण मी २००८- २००९ मध्ये फसणार होतो, पण माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही आणि हीचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय, असं मनीष धुरी म्हणाले.

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कृष्णा हेगडेंचं पोलिसांना पत्र 

भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत. (BJP Leader Krishna Hegde allegations against Renu Sharma)

संबंधित बातम्या : 

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप

कृष्णा हेगडेंचा रेणू शर्मावर गंभीर आरोप; धनंजय मुंडे सेफ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.