ओबीसी आंदोलन स्थगित होताच पंकजा मुंडे यांची तात्काळ पत्रकार परिषद, पाहा काय म्हणाल्या…

राज्य सरकारकडून शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली होती. या बैठकीला ओबीसी नेते उपस्थित होते. त्यानंतर आज ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली.

ओबीसी आंदोलन स्थगित होताच पंकजा मुंडे यांची तात्काळ पत्रकार परिषद, पाहा काय म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी टोचले सरकारचे कान
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 4:28 PM

ओबीस आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची समजूत काढायला राज्य सरकारला यश आलं आहे. शुक्रवारी झालेल्या महाबैठकीनंतर आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हाके यांनी हे उपोषण त्यांनी तात्काळ स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे. या उपोषणानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषद पंकजा मुंडे काय म्हणाल्या जाणून घ्या.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

हाकेंच्या उपोषणाची दखल घेतली आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी उपोषण स्थगित केलं. सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळावं म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतलं असेल. पण त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये. हाके आणि वाघमारे यांनी ज्या मागण्या दिल्या, त्यांनी मत आणि मागण्या सांगितल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र दिलं आहे, असं म्हटलंय. तर ते तपासलं पाहिजे. चुकीचं असेल तर रद्द केलं पाहिजे. नसेल तर तसं सांगितलं पाहिजे. त्यात कुणाला अडचण असण्याचं कारण नाही. हाके यांचं सालस उपोषण आहे. त्यांची भाषा नम्र आहे. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून रिस्पेक्ट वाटतो. बाकी कोण काय म्हणतंय त्याकडे पाहण्याची गरज नसल्याचं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

खरं चित्र जे आहे ते प्रचंड दुर्देवी आहे. मी अनेकवेळी म्हटलंय की, ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांच्यात भांडण होऊ नये असं मी सांगायचे. मी कोणत्याही मंचावर जाऊन कुणाला काही बोलावं असं मी कधी केलं नाही. आपल्या राज्यात सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. त्यातून राज्यकर्तेच मार्ग काढू शकतात. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले मुद्दे घेऊन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले तर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

आपण संविधानाच्या आधीन आहोत. कोणताही समाज संविधानाच्या वर नाही. दोन्ही बाजूचे लोकं एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही. संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत झालं पाहिजे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न नाही. एखाद्या समाजाला न्यूनगंड वाटत असेल तर त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे, असंही पंकजा मुडे म्हणाल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.