“जानकर, आठवले, विनायकराव यांना मी हाताला धरून आणलं”; भाजपच्या या नेत्याने मनातील खदखद दाखवून दिली…
राज्यातील इतर पक्षामधील नेते भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन राजकीय वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच पक्षाला झाला आहे.
मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असले तरी आता भाजपमधीलच वाद उफाळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत वादही आता चव्हाट्यावर आल्याने आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडूनही वारंवार आपल्याच पक्षाला त्यांनी अनेकदा त्यांनी घरचा आहेर दिला आहे. तर आताही त्यांनी भाजपवरच त्यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांग सध्याच्या काळातील राजकारण बदलत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले की, गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर महादेव जानकर, रामदास आठवले, विनायकराव यांना मी हाताला धरून पक्षात आणलं होतं. मात्र आता राजकारण बदलले आहे.
जानकर, आठवले आणि विनायकराव यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर त्यांचा पक्षाला आणि पक्षाचा त्यांनाही फायदा झाला होता.
तर त्यावेळी या नेत्यांना भारतीय जनता पार्टीत माझा मोठा रोल होता तेव्हा मी महाराष्ट्राच्या कोअर कमीटीत होते असं सांगत सध्या राजकारण कसे बदलत गेले आहे त्यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
राज्यातील इतर पक्षामधील नेते भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन राजकीय वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच पक्षाला झाला आहे. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्रातही आपली ताकद वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पंकज मुंडे यांनी सांगितले की, ज्या काळात भाजपची सत्ता नव्हती. अशा काळातच पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजे.
त्यामुळेच त्यांनी म्हटले आहे की, सत्ता नसताना जे सोबत होते त्यांन सोबत घेतले पाहिजे आणि त्यांना सन्मानानं पक्षात स्थान दिलं पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे भविष्यातही तशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रातील नेते घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले.