‘हा’ केविलवाणा प्रयत्न…; पुणे अपघात प्रकरणी भाजप नेत्याचा विरोधकांवर निशाणा

BJP Leader Pravin Darekar on Pune Kalyaninagar Porsche Accident : पुण्यातील अपघात प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावर चहूबाजूने प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते प्रविण दरेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

'हा' केविलवाणा प्रयत्न...; पुणे अपघात प्रकरणी भाजप नेत्याचा विरोधकांवर निशाणा
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 6:20 PM

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणावरून सध्या वातावरण तापलेलं आहे. सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. अशा दुर्दैवी अपघाताची राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः जाऊन काडक कारवाई केली जाईल हे सांगितलं आहे. ज्या पबमधून आरोपी गेला होता. त्यावर कारवाई झालेली आहे. विरोधक राजकारण करण्याचा दुर्दैवी आणि केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सारं काही कठोर केलं जाईल, असं प्रविण दरेकर म्हणालेत. प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

धगेंकरांना प्रत्युत्तर

रविंद्र धंगेकर आणि अनिल देशमुख यांनी या प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि सरकारला सवाल केलेत. यावरही प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुसता बोल घेवडेपणा करून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न धंगेकर करत आहेत. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे.जे स्वतः तुरुंगात जाऊन आले त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

शिशिर शिंदे यांची भूमिका योग्य आहे. अस्तानीतील निखारे जवळ बाळगून त्रास होतो.माझा आरोप आहे की, गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांना तिकीट हवं होतं. मग वेळेवर त्यांनी उमेदवारी मागे घेतली असती. अमोल किर्तीकर यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हे केलं असतं, असंही प्रविण दरेकर म्हणाले.

ठाकरे गटाच्या टीकेला प्रविण दरेकरांचं उत्तर

निवडणूक विभाग अपयशी ठरलं आहे. जे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी ही भूमिका मी त्याच दिवशी घेतली. कोंबड्याच्या खुरड्यासारखी मतदान केंद्र होती. पाणी नव्हतं. 3-4 % मतदानावर परिणाम झाला. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी NGO ला पाणी वाटू दिलं नाही. सेंटर आणि रांगा Air Condition असाव्यात. येणाऱ्या अधिवेशनात मी यावर बोलणार आहे, असं म्हणत प्रविण दरेकरांनी ठाकरे गटाच्या आरोपांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.