मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना शनिवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर आता भाजप पक्ष आणखीनच आक्रमक झाला आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते राम कदम यांनी केली आहे. (BJP want Sachin Waze Narco test)
राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 288 आमदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. भाजपने केवळ सचिन वाझे यांना अटक करावी, इतकीच मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारने ही मागणी मान्य केली नाही. सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात? यासाठी सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांन केली.
मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असे राम कदम यांनी म्हटले.
मनसुख हिरेन प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या अटकेनंतर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सचिन वाझेला अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असे सोमय्या यांनी म्हटले.
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात रविवारी ट्विट करुन भाष्य केले. सचिन वाझे हे शिवसेनेचे प्रवक्त होते. त्यामुळे आता ओसामा सचिन वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय करणार, हे आता बघावे लागेल. याप्रकरणात आणखी काही गोष्टी लवकरच समोर येतील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप
(BJP want Sachin Waze Narco test)