Param Bir Singh : हे ठाकरे सरकारचे पाप, मुंबई पोलिसांची इतकी बदनामी कधीच झाली नाही, भाजपचा हल्लाबोल

परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांची गच्छंती झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Param Bir Singh : हे ठाकरे सरकारचे पाप, मुंबई पोलिसांची इतकी बदनामी कधीच झाली नाही, भाजपचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 5:41 PM

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची घोषणा केलीय. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. तर परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांची गच्छंती झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sudhir Mungantiwar and Praveen Darekar reaction on Mumbai CP Paramvir Singh’s transfer)

आशिष शेलार –

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. एक ट्वीट करत, हे ठाकरे सरकारचं पाप असल्याचं शेलार म्हणालेत. “एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलीसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!” असं ट्वीट शेलार यांनी केलं आहे.

सुधीर मुंगंटीवार –

परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन काही साध्य होईल असं वाटत नाही, असं म्हटलंय. “पोलिसांचं राजकीयिकरण होणार नसेल, राजकीय नेते आपला सूड घेण्यासाठी पोलिसांचा वापर करणार नसतील तर ही यंत्रणा योग्यरित्या चालेल. राजकीय नेत्यांचा धाक असावा पण दबाव नको. राजकीय नेत्यांचं मार्गदर्शन असावं, पण पोलिसांमार्फत स्वत:चा स्वार्थ साधण्याची वृत्ती नसावी. हेच पोलीस अधिकारी चांगलं काम करु शकतात. जेव्हा तुम्ही त्यांना काम करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करता. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी आपण राजकीय नेते म्हणून आपल्यात बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करु शकेल”, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

प्रवीण दरेकर –

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणं स्वाभाविक आहे. ज्या प्रकरणात वाझे नावाचा अधिकारी या विषयात सहभागी होता. त्याला कंट्रोल करणार अधिकारी पोलीस आयुक्त होते. त्यामुळे उद्या या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तर मुंबई पोलीसांना हा मोठा धक्का असता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्वाभाविक आहे. तसंच पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाही. तर मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचं प्रकरण धसास लागावं हा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्ही हे प्रकरण लावून धरलं. याची वस्तूस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, हे आमचं ध्येय असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हयलंय.

मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडमोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे.  महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Mumbai New Police Commissioner : अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी, मनसेचा ‘स्फोटक’ आरोप

Sudhir Mungantiwar and Praveen Darekar reaction on Mumbai CP Paramvir Singh’s transfer

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.