मुंबै बँकेच्या निवडणुकीत भाजप सत्तेबाहेर, राष्ट्रवादीला सत्ता तर शिवसेनेला वाटाण्याच्या अक्षदा; नेमकं काय घडलं पडद्यामागे?

मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चित असणाऱ्या मुंबै बॅंक निवडणूकीत महाविकास आघाडीनं सत्तेच पान फिरवत भाजपकडून सत्ता काढून घेतली आहे.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत भाजप सत्तेबाहेर, राष्ट्रवादीला सत्ता तर शिवसेनेला वाटाण्याच्या अक्षदा; नेमकं काय घडलं पडद्यामागे?
political leader
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 3:58 PM

मुंबई: मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चित असणाऱ्या मुंबै बॅंक निवडणूकीत महाविकास आघाडीनं सत्तेच पान फिरवत भाजपकडून सत्ता काढून घेतली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ आली आहे. शिवसेनेच्या हाती मात्र वाटाण्याच्या अक्षदाच आल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. पडद्यामागे झालेल्या राजकीय घडामोडीत शिवसेनेने भाजपला दूर सारण्याची खेळी केली. मात्र राष्ट्रवादीने बाजी मारून भाजपसह शिवसेनेलाही छोबीपछाड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांचीच खेळी अंगलट आल्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबै बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विशेष मेहनत घेतली होती. प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात या निवडणुकीत 17 जागा बिनविरोध तर चार जागा या निवडून आल्या होत्या. बहुमतासाठी लागणाऱ्या एकूण 21 जागा जिंकूनही भाजपला सत्ता मिळू शकली नाही. महाविकास आघाडीनं एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव अजेंडा राबवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि मुंबै बॅंकेत गेल्या अनेक वर्षांपासून संचालक म्हणून सक्रिय असणारे शिवाजीराव नलावडे यांनी सूत्रं फिरवली. यामध्ये स्वत:चे 5, एक अपक्ष ( जो भाजपचाच दरेकरांनी निवडून आणला होता ) शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 असे 11 चे गणित जुळवत राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आणला गेला.

अभिषेक घोसाळकर पराभूत

काल सकाळी अचानकपणे अजित पवार, शरद पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून शिवसेनेच्या तीन संचालकांना राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आदेश दिले गेले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांची खेळी त्यांच्यावरच उलटली असल्याची जोरदार चर्चा यानंतर उमटत आहे. कारण राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आला असला तरी दुसऱ्या बाजूला उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचे पूत्र आणि मुंबै बॅंकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांचा मात्र पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा ‘करेक्ट’ कार्यक्रम?

अध्यक्षाच्या वेळी मिळालेली 11 मते उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेनेला मिळू शकली नाहीत. यातील एक मत फुटल्या गेलं. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोसाळकर यांना केवळ 10 मते मिळाली. याचाच अर्थ महाविकास आघाडीच एक मत फुटलं आणि याचा मोठा फटका शिवसेनेला सहन करावा लागला. एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवताना महाविकास आघाडीला केलेल्या मदतीचा शिवसेनेला मात्र काडीचाही फायदा झाला नाही. याउलट भाजपसोबतच शिवसेनेचाही राष्ट्रवादीनं ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्याची चर्चा रंगतेय. मुख्यमंत्र्यांनीही या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. आता तरी शिवसेनेला कळालं असेल की आमचा घात केल्यानंतर त्यांचाही घात झाला. यातच ईश्वरचिट्ठीने निवडून आलेला उमेदवार म्हणजे ईश्वरच आमच्या बाजूने आहे हे दिसून येतं, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला चांगलंच डिवचलं.

तर दरेकर वर्चस्व सिद्ध करतील

मुंबै बँकेच्या निवडणूकीत दरेकर पायउतार झाले असले तरी महाविकास आघाडीला ही सत्ता फार काळ टिकवता येईल अस चित्र अजिबातच नाहीये. 17 बिनविरोध आणि 4 उमेदवार दरेकर यांच्याच नेतृत्वात निवडून आले होते. याशिवाय वादग्रस्त मजूर संस्था निवडणूक परत होणार असून यामध्ये दरेकरांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. असं झालं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरूद्ध भाजप आमने सामने येऊ शकते. यामध्ये दरेकर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची शक्यता आहे.

आजही सर्वाधिक जागा प्रविण दरेकरांकडेच

भाजप – 10 विष्णु घुमरे – 1 राष्ट्रवादी – 5 काँग्रेस – 2 शिवसेना – 3

संबंधित बातम्या:

18 जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मतदारांना सावर्जनिक सुट्टी जाहीर

Nashik ZP| झेडपी निवडणूक लांबणीवर पडणार; पण मुदतवाढ न मिळता प्रशासक येण्याचे संकेत, कारण काय?

प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.