राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार कोटेचा यांचा दावा

राणी बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत 106 कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे. ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.

राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार कोटेचा यांचा दावा
mihir kotecha
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:04 PM

मुंबई: भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. राणी बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत 106 कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे. ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.

मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे 136 कोटी रु. वाचविले होते. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही आम्ही उघडकीस आणला. महापालिकेच्या रस्ते निविदांत संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. 100 कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे 185 कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले, असं कोटेचा यांनी सांगितलं.

आयुक्तांना पत्रं लिहून तक्रार

निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 20 ऑक्टोबर रोजी पाठविले होते. विनोद मिश्रा यांनीही असेच पात्र महापालिका आयुक्तांना 21 ऑक्टोबर रोजी पाठविले होते. 29 नोव्हेंबरला निविदा उघडण्यात आल्या. त्यावेळी आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी 106 कोटी अधिक रकमेची निविदा सादर केली आहे. 188 कोटींच्या बोलीसाठी 294 कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगतिलं.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

या संदर्भात आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले महापालिकेचे निवृत्त उपायुक्त हे ‘भ्रष्टाचाराचे महामार्ग’ तयार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

College Reopen : शाळांचं ठरलं..! महाविद्यालयांचा देखील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे, उदय सामंत यांनी काय सांगितलं?

हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाला ‘चिवा’ नाव ठेवू, महापौर किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघांवर पलटवार

School Reopen : 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु, बारावीपर्यंतचे वर्ग चालू होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.