उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी, सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक सेलचा (BJP Minority Cell) प्रमुख चक्क बांगलादेशी नागरिक निघालाय.

उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी, सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 10:53 PM

मुंबई : भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक सेलचा (BJP Minority Cell) प्रमुख चक्क बांगलादेशी नागरिक निघालाय. भाजपचाच पदाधिकारी बांगलादेशी निघाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची जोरदार कोंडी केलीय. तसेच हा भाजपचा संघजिहाद आहे का? असा सवाल उपस्थित केलाय. भाजपचे पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले, काहीजण तर पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट निघाले. आता भाजपची प्रगती त्याच्याही पुढे झाल्याचा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला. या प्रकरणानंतर भाजपने संबंधित पदाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं आहे (BJP Minority cell chief found as a Bangladesh citizen Congress attack BJP).

सचिन सावंत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले. हे सर्व आपल्यासमोर असताना भाजपची प्रगती त्याच्याही पुढे झाली आहे. आता उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपात ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपासाठी काही वेगळे प्रावधान केले आहे का? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे.”

“मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला भाजपच्या पदावर नियुक्ती केली जाते. दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपचं हे वागणं म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असं दिसते. भाजपमध्ये तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपने सुरु केली आहे काय? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे,” असंही सचिन सावंत यांनी विचारलं.

हेही वाचा :

‘पंपावर मोदींचा आधी हसरा फोटो, नंतर मास्क, आता वाटतं मोदींच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी’, इंधन दरवाढीवरुन काँग्रेसचा टोला

आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली; सेलिब्रिटींची नाही: सचिन सावंत

भारतीय जनता पक्षाचा आत्मा ईव्हीएममध्ये, काँग्रेस नेत्याचा भाजपला टोला

व्हिडीओ पाहा :

BJP Minority cell chief found as a Bangladesh citizen Congress attack BJP

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.