“संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावे”; भाजप नेत्यानं संजय राऊत यांची औकात काढली, कारण…

| Updated on: Feb 19, 2023 | 4:13 PM

शिंदे गटाला ज्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात खेचले होते, त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांनी आपल्या परिवारालाही त्यांनी पैशासाठी न्यायालयात खेचले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावे; भाजप नेत्यानं संजय राऊत यांची औकात काढली, कारण...
Follow us on

मुंबईः शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याचा निर्णय झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह, भाजप आणि न्यायपालिकेवरही जोरदार हल्लाबोल केला. न्यायालयं ही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी काल केला होता. त्यानंतर शिंदे गटातील नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

वेगवेगळ्या प्रकारची टीका संजय राऊत यांच्याकडून केली जात असल्याने भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी संजय राऊत यांची औकात काढली आहे. त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावे अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.

शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता ज्या प्रमाणे शिंदे गटाकडून टीका केली जात आहे. त्याच प्रमाणे भाजपकडून सडकून टीका केली जात आहे.

ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली होती,

मात्र उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी त्यांनी हिदुत्व सोडले होते असा घणाघात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिंदे गटाला ज्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात खेचले होते, त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांनी आपल्या परिवारालाही त्यांनी पैशासाठी न्यायालयात खेचले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

संजय राऊत सध्या ज्या प्रमाणे आता बोलत आहेत. ज्या प्रकारे टीका करत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी या गोष्टी उद्धव ठाकरे यांना न्यायालयात सांगावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि भाजप असा सामना पुन्हा एकदा बघायला मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.