तर उद्धव ठाकरेंना शंभर टक्के पाठिंबा देऊ; आशिष शेलार यांच्याकडून मलिकांच्या हकालपट्टीची मागणी
आतंकवादाच्या विरोधातील लढाईत शिवसेनेने (shivsena) भाजपला (bjp) समर्थन दिलं पाहिजे. देव, देश, धर्म हे नुसतं बोलण्यासाठी नसतं. उद्धवजी हे कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राने आता खूप ऐकलं आहे.
मुंबई: आतंकवादाच्या विरोधातील लढाईत शिवसेनेने (shivsena) भाजपला (bjp) समर्थन दिलं पाहिजे. देव, देश, धर्म हे नुसतं बोलण्यासाठी नसतं. उद्धवजी हे कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राने आता खूप ऐकलं आहे. देव, देश धर्मासाठी दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात गुन्हे दाखल करा. शरद पवार यांच्या समोर झुकू नका. नवाब मलिक यांना बडतर्फ करा. त्यांची हकालपट्टी करा, असं सांगतानाच आघाडीतील तीन पक्षात आमची केवळ उद्धव ठाकरेंकडूनच अपेक्षा आहे. अन्य दोन पक्ष वाया गेलेले आहेत. त्यामुळे उद्धवजी दहशतावाद्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल असा आमचा समज आहे आणि विश्वास आहे. तुम्ही अशी भूमिका घेतल्यास त्याला भाजप कोणतेही आढेवेढे न घेता, अट न टाकता, कोणतेही राजकीय भांडवल न करता तुम्हाला शंभर टक्के समर्थन देऊ. या कारवाईविरोधात तुमच्यासोबत उभं राहू. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात निवेदन ठेवावं. राजकारण बाजुला ठेवून भाजप खुल्या दिलाने तुमचं स्वागत आणि समर्थन करेल, असं भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी म्हटलं.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तसेच या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी दहशतवाद्यांविरोधात भूमिका घेतल्यास आम्ही त्यांचं स्वागत आणि समर्थनच करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आणि दहशतवादाविरोधातील लढाईसाठी पवारांच्या समोर झुकू नका. झुकेंगे नही हा नारा देऊन चालणार नाही. तसे वागावे. मुंबई पोलिसांना आदेश द्या, दाऊदचे गुंडे हस्तक आणि राजकीय हस्तकांवर एफआयआर दाखल करायला सांगा. अशा किती मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार दाऊद सोबत झाले त्याचा तपास व्हावा, असं शेलार म्हणाले.
सत्य समोर यावं
मलिक प्रकरणातील सत्य समोर यावं. ही राजकीय अटक नाही. त्याची एक पार्श्वभूमी आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात 2017 मध्ये इक्बाल कासकर आणि मुमताज शेख विरोधात गुन्हे दाखल झाले. होते. मालमत्ता बळकावणे आणि खंडणी मागणे आदी गुन्हे दाखल झाले होते. 2017पासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे, असं शेलार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या: