Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; राम सातपुतेंचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरीबांच्या मुलांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त आपल्याच मुलाची काळजी आहे. त्यांनी आपल्या मुलाला मंत्री केलं. आमच्या गरिबांच्या लेकराचं काय?, असा सवाल भाजप नेते, आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; राम सातपुतेंचा सवाल
ram satpute
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 7:06 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरीबांच्या मुलांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त आपल्याच मुलाची काळजी आहे. त्यांनी आपल्या मुलाला मंत्री केलं. आमच्या गरिबांच्या लेकराचं काय?, असा सवाल भाजप नेते, आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

राम सातपुते यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा सवाल केला आहे. महाराष्ट्र सरकारला गोरगरीब मुलांचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. पण गोरगरिबांच्या मुलांच्या नोकरीची काळजी त्यांना नाही. गोरगरिबांच्या चुलीत पाणी टाकायचं ही राज्य सरकारची भूमिका आहे, असं राम सातपुते यांनी सांगितलं. स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्र्यांनी मंत्री केल तर मग आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?, असा सवालही त्यांनी केला.

दोषींवर गुन्हा दाखल करा

तरुणांच्या पिढ्या बरबाद करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. या पेपरफुटी प्रकरणातील दलाल हे सरकारचे दलाल आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे. चौकशी केली पाहिजे. भरतीमध्येही वाझे वसुली करणार हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. चांगलं केलं की आम्ही केलं. वाईट झालं की केंद्रान केलं. आर्मी इंटेलिजन्सचा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव ठेवावा, असंही ते म्हणाले.

कोण आहेत सातपुते?

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्याा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. ऊसतोड मजुराचा मुलगा ते थेट आमदार असा त्यांचा थरारक प्रवास आहे. अवघ्या 30 व्या वर्षी राम सातपुते हे आमदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव करून ते थेट विधानसभेत पोहोचले आहेत. राम सातपुते यांनी पुण्यातून इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे. संघाच्या आणि भाजपच्या संपर्कात आलेल्या सातपुतेंना उमेदवारी देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सातपुते हे माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी भागातील रहिवासी आहेत. त्यांचे मूळ गाव बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव-बीड रोडवरील डोईठाण हे आहे. त्यांचे वडील विठ्ठल सातपुते हे शंकर सहकारी कारखान्यात ऊसतोड कामगार होते. त्यांची आई जिजाबाई या सुद्धा शेतता मोलमजुरी करायच्या. 1990 ते 1995 ही पाच वर्षे विठ्ठल सातपुते यांनी या साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीचे काम केले होते. परंतु मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, आपला मुलगा ऊसतोड कामगार होऊ नये म्हणून त्यांनी राम यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं. राम यांनी पुण्यात राहून मुद्रण तंत्र पदविका आणि पदवीचे शिक्षण घेतलं आहे. विठ्ठल सातपुते आजही त्यांच्या गावी चपला शिवायचे दुकान चालवतात.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांचे निर्देश

मुंबईत रेल्वे स्थानकांवर आणखी 49 पदचारी पूल, प्रवाशांच्या अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत होणार

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार : उदय सामंत

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....