Vinod Tawade : महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही, विनोद तावडे यांनी सांगीतला हा फॉर्म्युला
Vinod Tawade on Mahayuti CM : महाविकास आघाडी आणि महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप जाहीर केला नाही. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत संख्याबळ ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री असा पवित्रा घेतला. तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी संख्या बळावर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार नसल्याचे सांगीतले.
महाविकास आघाडी आणि महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप जाहीर केला नाही. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत संख्याबळ ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी संख्या बळावर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार नसल्याचे सांगीतले. आज टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले.
ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र
भाजपमध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ते शंभर टक्के होत नाहीच. राष्ट्रीय स्तरावर काम करताना आनंद मिळतोय. मी २० वर्ष आमदार होतो. पाच वर्ष ९ खात्याचा मंत्री होतो. अशी नऊ खाती की आधीच्या सरकारमध्ये ९ जण सांभाळत होती. नंतर परत आठ जण सांभाळत होती. अशी नऊ खाती एकत्र सांभाळली. आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते त्याचा आनंद आहे. दिल्लीत राहावं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करावं वाटतं. ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र, असे तावडे म्हणाले.
फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा मैदानात
भाजप ही फडणवीस यांच्या नेतृत्वात लढत आहे. महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहे. मुख्यमंत्री कोण काय हे निवडणुकीनंतर ठरवलं जाईल. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व ठरतील. राजस्थानमध्ये पाहा. भजनलाल मुख्यमंत्री झाले. त्यांचं नाव चर्चेच नव्हतं. मोहन यादव मध्यप्रदेशात. इतर राज्यातही असंच आहे. चर्चा होते ते मुख्यमंत्री होतेच असं नाही. पण काही अपवादही असतात, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही
मुख्यमंत्रीपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसवून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल किंवा बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले. आमचे आमदार जास्त पण नितीश कुमार झाले. पण त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर लक्षात घेऊन करावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताचं पाहून निर्णय घ्यावा लागेल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी त्यांचं राजकीय विश्लेषण मांडलं. पण राज ठाकरेंनी लोकसभेवेळी बिनशर्त आम्हाला पाठिंबा दिला आणि प्रचार केला. आता दोन पोल आहे, महाविकास आघाडी आणि महायुती आहे. त्यात मनसे आमच्या जवळचे आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने मनसेसोबत काही जागांवर अंडरस्टँडिंग केलं होतं. शिवडीत बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिला. माहीममध्ये ठरलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी ती जागा लढवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आम्ही महायुतीच्या सोबत आहेत, असे ते म्हणाले.