Sanjay Raut: मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट, केंद्र सरकारला प्रेझेंटेशन सादर; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut: भाजपचे नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे.
मुंबई: भाजपचे (bjp) नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे. त्यांच नेतृत्व किरीट सोमय्या (kirit somaiya) करत आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं प्रेझेंटेशन याच भाजपच्या पाच लोकांनी तयार केलं. सर्व चोर आणि लफंगे आहेत. त्यांचं नेतृत्व सोमय्यांकडे आहे. काहीही करून त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी सोमय्या हा लफंगा, चोर, हा महाराष्ट्रद्रोही दिल्लीत जात असतो. मी सांगतो त्याला सबळ पुरावे आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खळबळजनक आरोप केला. मुंबईतील शाळेत मराठी सक्तीची करू नये यासाठी सोमय्या कोर्टात गेले होते. आता भाजपचं सरकार आल्याने त्यांना बळ मिळालं आहे. त्यामुळेच मुंबईला केंद्रशासित करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
पैसा गोळा केला की नाही?
मी तुम्हाला या आधी सांगितलं. तुमचे मुलुंडचे महात्मा आहेत. ते सांगत होते 58 कोटीचा हिशोब द्या. तू हिशोब दिला पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे, तुम्ही नाही म्हणत अमूक कोटी तमूक कोटी तो कुठून हिशोब आणता? विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केले की नाही हा पहिला प्रश्न आहे. ते प्रातिनाधिक होते, सिम्बॉलिक होते, असं सांगत आहेत. नाही. तुम्ही दहा दिवस पैसा गोळा करत होतात. 700 खोके भरले होते. पैसा कसा गोळा केला हे माहीत आहे. नौटंकी बंद करा. पुरावे आहे. गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस काम करत आहेत. पैसे गोळा झाला की नाही. सेव्ह विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केले की नाही हा सिंपल प्रश्न आहे. तुम्ही पैसे गोळा करून पचवून ढेकर दिले. त्याचा दुर्गंध येत आहे. तुम्ही त्या पैशाचं काय केलं. याची सर्व माहिती मला आहे, असं राऊत म्हणाले.
देशद्रोह्याचं समर्थन करू नका
भाजपचे सर्व नेते या गैरव्यवहाराचे समर्थन करत असेल तर त्यांची फाईल तयार करावी लागेल. काश्मीर फाईल प्रमाणे ही विक्रांत फाईल आहे. भाजपचे नेते भ्रष्टाचाराचं समर्थन करत आहेत. ठिक आहे. पण देशद्रोह्याचं समर्थन करू नका. हे सोमय्याचं प्रकरण अफजल गुरू, कसाब इतकंच भयानक आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळलेला हा माणूस आहे, असा आरोप त्यांनी केला.
इधर उधर की बात मत कर
इधर उधर की बात मत कर. जो मैने सवाल पुछा है अपने पैसा जमा किया है या नही किया. बस सिंपल. त्याच्याकडे प्रश्नच नाही. त्यांनी चोरी केली आहे. मी त्यांना सोडणार नाही. आणखी दहा प्रकरण काढेल. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणाने करावा. ते करणार नाही. ते दिल्लीत गेले. तिकडेही नौटंकी करणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: