पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुंबईत भाजपचं ठिकठिकाणी चक्का जाम, संजय राठोडांच्या अडचणी वाढणार?

भाजपकडून आज (27 फेब्रवारी) मुंबईत ठिकठिकाणी चक्काजाम केले जाणार आहे. (bjp sanjay rathore pooja chavan)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुंबईत भाजपचं ठिकठिकाणी चक्का जाम, संजय राठोडांच्या अडचणी वाढणार?
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 9:06 AM

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore ) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपने भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. याच मागणीसाठी भाजपकडून आज (27 फेब्रवारी) मुंबईत ठिकठिकाणी चक्काजाम केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता या चक्काजामला सुरुवात होईल. भाजप महिला मोर्चातर्फे हरी ओमनगर, म्हाडा कॉलनी नंतरचा सिग्नल, मुलुंड पूर्व हायवे येथे हे आंदोलन केले जाईल.  (BJP  chakka jam in Mumbai demands resignation of Sanjay Rathore and inquiry of Pooja Chavan)

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, मुंबईत भाजपचे ठिकठिकाणी आंदोलन

पूजाच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप तसेच संजय राठोड आणि पूजा चव्हाणचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार असल्याचा उघड आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला आहे. राठोड यांची  हकालपट्टी करावी अशी मागणीही भाजपने मागील अनेक दिवसांपासून लावून धरली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या महिला मोर्चातर्फे मुंबईत चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.

यावेळी आंदोलनादरम्यान पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूचा निषेध नोंदवला जाईल. तसेच पूजाच्या मृत्यूची चौकशी करावी तसेच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणींचा पुनुरुच्चार या आंदोलनादरम्यान केला जाईल. भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली हरी ओम नगर, म्हाडा कॉलनी नंतरचा सिग्नल, मुलुंड पूर्व हायवे येथे आजचे चक्का जाम आंदोलन होईल.

संजय राठोड यांचे पूजाला 45 फोन?

यापूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले आहेत. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या 101 या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला. तसेच त्या दिवशी 101 क्रमांकावरून झालेलं अरुण राठोडचं संभाषण जाहीर करून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केलीये.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढत आहे. राठोड यांच्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

इतर बतम्या :

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत, पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाही, फडणवीस भडकले

‘मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना’, फडणवीसांकडून ठाकरे सरकारची खिल्ली 

(BJP  chakka jam in Mumbai demands resignation of Sanjay Rathore and inquiry of Pooja Chavan)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.