आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू | Devendra Fadnavis

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
राज्याचे गृहमंत्री म्हणतात या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करू. मात्र, शरजील उस्मानीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तो हिंदू समाजाला स्पष्टपणे सडका म्हटल्याचे ऐकायला मिळते.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 8:12 PM

मुंबई: आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis says BJP will come in power soon)

ते गुरुवारी प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना संकटाची हाताळणी, मेट्रो कारशेड आणि अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही लोकांच्या इगोमुळे पुढची चार वर्षे मेट्रो सेवा सुरु होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

‘आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये’, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

अनेक नेत्यांना चांगलं भाषण करता येतं, पण संघर्षाची वेळ आल्यावर मैदानातून पळ काढतात: फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात काही लक्षवेधी विधाने केली. भाषणं तर अनेक लोक करतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आल्यानंतर घरात लपून बसणारे, मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या नेत्यांच्या दिशेने होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

‘धारावी पॅटर्न’वरुन मुख्यमंत्र्यांना टोला?

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटलं की ‘मातोश्री’ला त्रास : आशिष शेलार

अनेक नेत्यांना चांगलं भाषण करता येतं, पण संघर्षाची वेळ आल्यावर मैदानातून पळ काढतात: फडणवीस

(Devendra Fadnavis says BJP will come in power soon)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.